Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: थरकाप उडवणारी घटना! वेणा घाटावर भाजप नगरसेविकेच्या मुलाचा आढळला मृतदेह; नेमकं काय घडलं ?

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 2 March 2026, 10:05

Crime News: वर्धा : वर्धा जिल्ह्यात रेती घाटाच्या वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेमुळे दोन्ही जिल्ह्यांत मोठी खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुलगाव येथील भाजपा नगरसेविकेचे पुत्र भरत नागपाल हे रेती घाटाचे काम पाहत होते. वर्धा आणि वरोरा सीमेवरील वेणा नदी पात्रातील रेती घाटाच्या पैशांच्या व्यवहारावरून काही दिवसांपासून दोन गटांमध्ये तणाव सुरू होता. हा वाद रविवारी रात्री उशिरा उग्र झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर हल्ला केल्याची माहिती आहे.

तलवारीने सपासप वार 

या गोंधळात भरत नागपाल यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. हल्ला अतिशय गंभीर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी मृतदेह वेणा नदीच्या पात्रात टाकल्याचे समोर आले आहे. या मारामारीत आणखी 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संशयितांना अटक 

घटनेची माहिती मिळताच वडनेर आणि वरोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जलद कारवाई करत 3 संशयितांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. ही घटना वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे.

एका लोकप्रतिनिधीच्या मुलाची अशा प्रकारे हत्या झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी खबरदारी वाढवली आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

बड्या अधिकाऱ्याची खरातशी 196 वेळा फोनवर चर्चा? डेप्युटी कलेक्टर अंजली दमानियांच्या रडारवर; SIT चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 18:23

पुणे जिल्हा परिषदेचे “मिनी मंत्रालय” कार्यान्वित होणार! उद्या विषय समित्यांचे वाटप आणि 83 सदस्यांची निवड

Wednesday, 15 April 2026, 17:58

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीत औरंगजेबाचा फोटो झळकला; छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापाची लाट

Wednesday, 15 April 2026, 17:43
Yawat

Yawat : वरवंडमध्ये घराच्या बांधकामावरून पती-पत्नीसह नातेवाईकांना मारहाण; दोन जणांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

Wednesday, 15 April 2026, 17:39

मीरा-भाईंदरमध्ये ‘लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 5 जणांशी लग्न करून केली लाखोंची फसवणूक

Wednesday, 15 April 2026, 17:16

पुरंदरच्या गराडे परिसरात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी; सासवड पोलिसांत महिलांसह एकूण 20 जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल

Wednesday, 15 April 2026, 17:13
Next Post

Iran-America War: महाराष्ट्राचा शेतकरी संकटात, युद्धाची ठिणगी जेएनपीए बंदरात; निर्यातीचे मार्ग बंद, कोणत्या पिकांची निर्यात थांबली?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.