Saturday, February 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sarpanch Administrator : राज्यातील सरपंचांचे टेन्शन वाढले! प्रशासक म्हणून काम करण्याच्या आशेवर पाणी; हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 9:43

Sarpanch Administrator : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारने नुकतेच महत्त्वाचे निर्देश दिले होते. 20 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामविकास विभागाने अधिसूचना काढून ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, त्या ठिकाणी विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून काम पाहण्याची परवानगी देण्यात येईल, असे नमूद केले होते. तसेच उपसरपंच आणि सदस्यांचा समावेश असलेली प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आले होते.

या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीनंतर न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरपंचांना प्रशासक म्हणून कार्यभार देऊ नये, असे पुढील आदेशापर्यंत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात 23 फेब्रुवारी 2026 रोजी काही ठिकाणी कार्यभार देण्यात आल्याचे समोर आले. त्या ठिकाणी सरपंचांनी कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नयेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मार्च रोजी होणार आहे.

राज्यात सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी अखेरीस संपत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत प्रशासन सुरळीत राहावे यासाठी सरकारने 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा समावेश असलेले मंडळ गावचा कारभार पाहणार होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते.

सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामविकासाच्या कामांना अडथळा येणार नाही, असा दावा करण्यात आला होता. मात्र या आदेशावर कायदेशीर प्रश्न उपस्थित झाल्याने आता न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Registration and Stamps Department : नोंदणी व मुद्रांक विभागातील गट – ड संवर्गातील अंतिम निवड यादी जाहीर

Saturday, 28 February 2026, 10:29

Khandala Ghat Train Accident : भयंकर थरार! खंडाळा घाटात सुसाट मालगाडीचे ब्रेक निकामी; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Saturday, 28 February 2026, 10:16

Sarpanch Administrator : राज्यातील सरपंचांचे टेन्शन वाढले! प्रशासक म्हणून काम करण्याच्या आशेवर पाणी; हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय?

Saturday, 28 February 2026, 9:43

Pune News: विद्यापीठ चौकातून जाताय? थांबा! 30 दिवस बदलावे लागणार मार्ग; ‘या’ वेळेत रस्ता राहणार पूर्णपणे बंद, काय आहे कारण?

Saturday, 28 February 2026, 8:57

Crime News: बायकोच्या स्टेटसवर घाणेरडी कमेंट, जाब विचारणे पडले महागात; लग्नाच्या वाढदिवशी पतीने गमावला जीव!

Saturday, 28 February 2026, 8:31

Pune Weather : फेब्रुवारी अखेर मे महिन्याचा तडाखा! पुण्यात तापमानाचा पारा चढला; ‘या’ भागात सर्वाधिक उकाडा

Saturday, 28 February 2026, 8:00
Next Post

Khandala Ghat Train Accident : भयंकर थरार! खंडाळा घाटात सुसाट मालगाडीचे ब्रेक निकामी; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.