Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News: मोहदरी घाटात काळाचा भीषण घाला! IT इंजिनिअरसह तिघांचा करुण अंत, थरकाप उडवणारा शेवट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 January 2026, 13:10

Accident News:  नाशिक : नाशिक–पुणे महामार्गावरील (Nashik Pune highway accident) मोहदरी घाट हा अपघातांसाठी मालिका काही संपतच नाही. अशातच बुधवारी सकाळी येथे भीषण अपघात झाला. अनियंत्रित कंटेनरने दुभाजक ओलांडून दिलेल्या जोरदार धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आयटी अभियंता, भाजीपाला व्यापारी आणि एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महामार्गावरील सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

हेही वाचा- Ajit Pawar: पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कुटुंबातील चार सदस्यांना उमेदवारी; अजित पवारांकडून स्पष्टीकरण, म्हणाले…

बुधवारी सकाळी सुमारे 10:15 वाजता मोहदरी घाटात हा अपघात घडला. सिन्नरकडून नाशिककडे जाणारा कंटेनर MH 46 AR 2725 चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध लेनमध्ये गेला. त्याच वेळी नाशिककडून सिन्नरकडे जाणारी महिंद्रा पिकअप MH 15 GV 7149 आणि एक दुचाकी MH 15 CB 6796 या कंटेनरच्या तडाख्यात सापडल्या. धडक इतकी भीषण होती की कंटेनर आणि पिकअप दोन्ही वाहने उलटली, तर दुचाकीस्वार कंटेनरखाली चिरडला गेला.

या अपघातात बाळासाहेब बाजीराव व्यापारी वय 42, नाशिक येथील भाजीपाला व्यापारी, अवधूत रामनाथ निर्मळ वय 23, आयटी अभियंता आणि शाजी फर्नांडो वय 50, दुचाकीस्वार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करत मृतदेह बाहेर काढले.

या अपघातातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे 23 वर्षीय अवधूत निर्मळचा मृत्यू. त्याची नुकतीच मुंबईतील एका नामांकित कंपनीत आयटी अभियंता म्हणून निवड झाली होती. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सुट्टीसाठी नाशिकला आला असताना तो आपल्या नातेवाईक बाळासाहेब व्यापारी यांच्या पिकअपमधून गावी जात होता. मात्र, घर गाठण्याआधीच त्याचा दुर्दैवी अंत झाला.

या अपघातामुळे मोहदरी घाटातील वाहतूक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Loni Kalbhor Crime News: दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, दोघेजण जखमी तर 11 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.