Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्योतिषाच्या नावाखाली वासनेचा खेळ! कॅप्टन खरातची ‘काळी कृत्ये’ येणार समोर; IPS तेजस्वी सातपुते लावणार प्रकरणाचा छडा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 19 March 2026, 15:31

नाशिक: स्वतःला अंकशास्त्रज्ञ, ज्योतिष म्हणवून घेणारा आणि राजकीय वर्तुळात वावरणारा कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून, आध्यात्मिक शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण करण्याचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

अशोक खरात हा मंत्रतंत्र, अंकशास्त्र आणि दैवी शक्तीचा दावा करून महिलांना जाळ्यात ओढत असे. अडचण निवारण्याच्या बहाण्याने महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने बुधवारी पहाटे ही कारवाई केली. न्यायालयाने खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयाची झडती घेतली असता, पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा ‘पेन ड्राईव्ह’ लागला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या पेन ड्राईव्हमध्ये तब्बल 58 व्हिडिओ आढळले आहेत. हे व्हिडिओ पीडित महिलांचे असण्याची शक्यता असून, त्याआधारे खरात ब्लॅकमेलिंग करत होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून अनेक बड्या नावांचे धागेदोरे समोर येण्याची भीती व्यक्त होत आहे.

या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खरातची पूजा केल्याचा एक जुना फोटो समोर आल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने एसआयटी (SIT) स्थापन केली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सातपुते यांची यापूर्वीची कामगिरी पाहता, या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

सणवार आणि तेलकट जेवण! आवडीने खा पण प्रकृतीचीही काळजी घ्या! पाहा 'हे' खास हेल्थ टिप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.