Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संभाजीनगरमध्ये भरधाव कारने दुचाकीला उडवलं; पती पत्नीचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 8 July 2024, 10:19

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले आहे, तर कारमधील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सतिश शाहू मगरे (वय-32) व पत्नी तेजल सतिश मगरे (वय-28, दोघेही रा. पाथरवाला, ता. अंबड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्यांची नावे आहेत.

 

ही घटना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड जवळ लेंभेवाडी फाट्यानजीक रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर कारचालक व अन्य एक जण जखमी अवस्थेत घटनास्थळाहून फरार झाले. मृत हे छत्रपती संभाजीनगर येथे सहा महिन्यापासून वकिली करीत होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, सतिश मगरे आणि पत्नी तेजल मगरे हे छत्रपती संभाजीनगर येथे सहा महिन्यापासून वकिली करीत होते. सतिश मगरे आणि पत्नी तेजल सतिश मगरे हे दोघे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पुतणीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी अंकुशनगर येथे आले होते.

साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून ते छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकीने जात होते. त्यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंभेवाडी शिवारात छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये सतिश मगरे व तेजल मगरे हे दोघे पती पत्नी जागीच ठार झाले.

दरम्यान, कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजूने जाऊन दुचाकीला धडकून शंभर फूट फरफटत नेली. यात मगरे दांपत्य कारखाली दबले गेले. कारमधील चालकासह अन्य एकजण जखमी अवस्थेत कारमधून बाहेर पडून पसार झाले.

या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व अंबडचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने कारखाली दबलेल्या दांपत्याला बाहेर काढले. त्यानंतर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण करीत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58
Next Post

राज्यात पावसाचा जोर वाढला; मुंबईत मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.