Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यभरातील 12 जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि सर्व शासकीय कार्यालयांना भरपगारी सुट्टी; कारण…

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 5 February 2026, 12:52

पुणे: पुणे, सोलापूरसह राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार आज (5 फेब्रुवारी) सायंकाळी थांबणार आहे. शनिवारी, 7 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार असून सोमवारी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि सर्व शासकीय कार्यालयांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

 

निवडणूक होणाऱ्या 12 जिल्ह्यांतील ग्रामीण भागात मतदानाच्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्योग, खासगी कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही शनिवारी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, कामगार आणि खाण विभागाने दिलेल्या आदेशानुसार 18 वर्षांवरील सर्व नोंदणीकृत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मालकांनी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आवश्यक सवलत द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी ज्या ठिकाणी कर्मचारी नोंदणीकृत मतदार असतील, त्यांना भरपगारी रजा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या 12 जिल्ह्यांतील मतदार इतर जिल्ह्यात काम करत असतील, तरी त्यांनाही सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हा निर्णय उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना लागू असून त्यामध्ये कारखाने, खासगी कंपन्या, दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, निवासी हॉटेल्स, भोजनालये, थिएटर, औद्योगिक युनिट्स, आयटी कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेल आउटलेट्स यांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार आज रात्री 10 वाजता संपुष्टात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 146 गणांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी 299, तर पंचायत समितीसाठी 528 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 29 लाख 72 हजार  359 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचारावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असून ही निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Pune Crime: अरे देवा! घर सजवण्याच्या नादात पुण्यातील तरुणाने गमावले 8 लाख रुपये, नेमक काय घडलं जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.