Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sport News : स्मृती मानधनाचं रँकिंग घसरलं! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर येण्यापूर्वीच ICC कडून वाईट बातमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 December 2025, 16:28
Sport News

photo- social media

Sport News : भारतीय महिला क्रिकेट संघासाठी हे वर्ष ऐतिहासिक ठरलं आहे. यंदाचा विश्वचषक जिंकत भारतीय महिला संघाने मोठी कामगिरी केली. विश्वचषकानंतरही संघाची कामगिरी घसरलेली नसून, दिवसेंदिवस संघ अधिक भक्कम होताना दिसत आहे. सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतही भारतीय संघ दमदार खेळ करत असून, याची दखल थेट आयसीसीकडून घेण्यात आली आहे.

 

मात्र आयसीसीच्या ताज्या टी-२० फलंदाज क्रमवारीत भारतीय उपकर्णधार स्मृती मानधनाला नंबर वन स्थान गमवावं लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिने अव्वल स्थान पटकावलं असून, स्मृती मानधना तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. तरीही स्मृती ही रँकिंगमधील सर्वोच्च स्थानावर असलेली भारतीय फलंदाज आहे.

लॉरा वोल्वार्डने आयर्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत सलग दोन सामन्यांत १२४ आणि नाबाद १०० धावांची खेळी करत रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली. याआधी तिने विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यातही सलग शतके झळकावली होती. वोल्वार्डकडे सध्या ८२० रेटिंग पॉइंट्स असून, हे तिचं आजवरचं सर्वोत्तम रेटिंग आहे. ती स्मृती मानधनापेक्षा ९ गुणांनी पुढे आहे.

दरम्यान, भारताची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिनेही रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. विश्वचषक उपांत्य फेरीत निर्णायक शतकी खेळी करणाऱ्या जेमिमाची टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत पाच स्थानांनी वाढ झाली असून, तिने थेट टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात जेमिमाने ४४ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी केली होती. या सामन्यात तिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

भारताची आणखी एक स्टार फलंदाज शेफाली वर्माची मात्र क्रमवारीत एक स्थान घसरण झाली आहे. तरीही ती टॉप १० मध्ये कायम आहे. सध्या शेफाली दहाव्या क्रमांकावर आहे. जेमिमा रॉड्रिग्ज टॉप १० मध्ये आल्यामुळे शेफाली एक स्थान खाली गेली आहे. विश्वचषकात शेफालीने केवळ दोन सामने खेळले असले तरी बदली खेळाडू म्हणून संधी मिळाल्यानंतर तिने उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण स्पर्धेत आपली छाप पाडली होती.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

लोणी काळभोरसह शहरीभागात देहविक्री व्यवसायावर कारवाई; तर उरुळी कांचनसह पुणे ग्रामीणमध्ये वेश्या व्यवसाय खुलेआम; पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.