Rohit Sharma Viral Video: सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने सात वर्षानंतर दमदार पुनरागमन करत लक्ष वेधून घेतले. त्याच्या प्रभावी खेळीमुळे सामन्याचे चित्र पालटले आणि मुंबईने सिक्कीमविरुद्धचा सामना सहज जिंकला. (Rohit Sharma Vijay Hazare Trophy Viral Video)

दरम्यान, या सामन्यादरम्यानचा एक हलकाफुलका क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबई विरुद्ध सिक्कीम सामन्यात रोहित शर्मा बाउंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत असताना काही चाहत्यांनी त्याला मजेशीर हाक दिली. “रोहित भाऊ, वडापाव खाणार का?” यावर रोहितने हात वर करून हसत, “नकारार्थी,” हातवारे करत तितकीच मजेशीर प्रतिक्रिया दिली.
रोहितच्या या सहज आणि दिलखुलास प्रतिसादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, संबंधित व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मैदानावरील कामगिरीसोबतच चाहत्यांशी असलेली त्याची आपुलकी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. Honest Cricket Lover या एक्स खात्यावर हा व्हिडीओ दिसून येत आहे.
पहा व्हिडीओ
During the Vijay Hajre Trophy match in Jaipur, people are teasing Rohit Sharma by asking him for VadaPav. 😭 pic.twitter.com/8wXm9mDewT
— Honest Cricket Lover (@Honest_Cric_fan) December 24, 2025
रोहीतने एकतर्फी सामना फिरवला
या सामन्यात सिक्कीमने पहिल्यांदा फलंदाजी करत 50 षटकांत 236 धावा ठोकल्या. यात विकेटकीपर-फलंदाज आशीष थापाने 84 चेंडूमध्ये 79 धावांची जबरदस्त खेळी उभारली. हे लक्ष्य साध्य करत असताना मुंबईकडून रोहित शर्माने धडाकेबाज फलंदाजी करत सामना एकतर्फी फिरवला होता. रोहितने अवघ्या 94 चेंडूमध्ये 155 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने 18 चौकार आणि 9 षटकार मारले. केवळ 62 चेंडूंमध्ये रोहितने शतक पूर्ण केले. रोहितच्या या धडाकेबाज खेळीमुळे मुंबईने हा सामना जवळपास 20 षटके शिल्लक राखून 8 विकेट्सने जिंकता आला.






