Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुर्दैवी घटना..! ४ शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू; चाकणजवळील कडाचीवाडी येथील दुर्घटना

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 1 June 2025, 14:45

पिंपरी-चिंचवड: चाकण नजिक कडाचीवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत दुर्दैवी घटना घडली. येथील पाझर तलावात पोहायला गेलेल्या ४ अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवार (दि. ३१ मे) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी चिमुरड्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.

 

ओमकार बाबासाहेब हंगे (वय १३ वर्ष, सध्या रा. मार्तंडनगर, मेदनकरवाडी, मूळ रा. हंगेवाडी, ता. केज, जि. बीड), श्लोक जगदीश मानकर (वय १३ वर्ष, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा.धनवडी, ता.वरुड, जि.अमरावती), प्रसाद शंकर देशमुख (वय १३, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा.अंबुलगा, ता.मुखेड, जि.नांदेड), नैतिक गोपाल मोरे (वय १३ वर्ष, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. बुलढाणा झरी बाजार,ता.अकोट, जि.अकोला) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी चिमुकल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत चौघेही मुलं शनिवारी (दि.३१मे) राहत्या घरातून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चाकणजवळील कडाचीवाडी गावच्या हद्दीतील पाझर तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते. तेंव्हा या सर्वांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपार होऊनही हे चौघे जण घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर कडाचीवाडी गावच्या हद्दीतील पाझर तलावाच्या काठावर या मुलांच्या चपला व कपडे आढळले.

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. घटनास्थळाचा चाकण पोलिसांनी पंचनामा केला असून, याप्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मृत चौघांचेही मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी मुलांचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

दोरीने ठेवले बांधून अन अंगावर दिले चटके, हुंड्यासाठी महिलेचा छळ; छ. संभाजीनगर येथे घडलेल्या घटनेने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.