Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताय? आता भरा ५०० रुपये दंड…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 2 January 2024, 16:21

पुणे : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी, पदपथ आणि रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना जरब बसावी, यासाठीची दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. यापूर्वी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना केवळ १८० रुपयांचा दंड आकारला जात होता. आता दंडाची रक्कम ५०० रुपये करण्यात आली आहे.

 

दंडाच्या रकमेत वाढ केल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार थांबतील, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचा हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेनुसार आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या मान्यतेनंतर तो राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, दंडाची रक्कम वाढविल्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार थांबण्याची शक्यता कमी आहे.

रस्ता अथवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता करणे; उघड्यावर लघुशंका करणे; सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे, छोटे स्टिकर्स लावणे, व्यावसायिक आस्थापनांमार्फत कचरापेटी न ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी, पदपथांवर, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना सध्या नियमानुसार १८० रुपयांचा दंड आकारला जातो. दंडाची रक्कम पूर्वी शासन मान्यतेने निश्चित करण्यात आली आहे. त्यात कालानुरूप वाढ झालेली नाही. त्यामुळे दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, यापुढे १८० रुपयांऐवजी ५०० रुपयांचा दंड आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

शासनाच्या मान्यतेनंतर सुधारित दंड आकारणार
या प्रस्तावाबाबत बोलताना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना १८० रुपये दंड केला जातो. ही रक्कम पूर्वीच निश्चित केली होती. अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी अशा प्रकरणात प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. शासनाच्या मान्यतेनंतर सुधारित दंड आकारला जाईल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
Next Post
Three friends attacked on youth in kolhapur

'आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे देत नाही, उलट आमचा बाप काढतोस का?' म्हणत शेतकऱ्याला रॉडने मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.