Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्याची वाचन संस्कृतीमध्ये ताकद’ ; ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांचे मत

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Thursday, 31 August 2023, 18:38

पुणे : सत्ताधारी उन्मत्त झाले, लोकशाही मूल्य जपत नसतील तर त्याना वठणीवर आणण्याची ताकद पत्रकार, लेखक, कलावंत यांच्यामध्ये आहे. त्यासाठी वाचनाची चळवळ सक्षम करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने वाचन चळवळीला गती देण्यासाठी मंत्रालयासमोर नरिमन पाँईट, मुंबई येथे ‘वाचकाभिमुख ग्रंथालय ही काळाची गरज व डिजिटल माध्यमांचा वाचनावर पडलेला प्रभाव’ या विषयावर परिसंवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून यादव बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ सिसिलिया कार्व्हालो, राज्य ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, पुरंदर पंचायत समितीचे माजी सदस्य बाळुतात्या यादव, माळशिरसचे आदर्श सरपंच महादेव बोरावके सर माजी सरपंच बाळासाहेब पाटील, सुनील यादव, चंद्रकांत बोरावके, सर्जेराव यादव, मोहन यादव, यु एफ. जानराव आदी उपस्थित होते.

 

जगभरात क्रांती घडवून आणण्याचे काम पुस्तकांनी केलं

यादव म्हणाले, वाचन चळवळ सक्षम झाली तर समाज समृध्द होतो. वारकरी संप्रदायाचा विचार संत नामदेव, संत तुकाराम महाराज यांनी तळा गाळात पोहचवला. त्यामुळे सक्षम विचारांचा मावळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या कामी आला. वाचनातून आत्मविश्वास निर्माण होतो, लढण्याची प्रेरणा मिळते. सत्ताधारी चुकीचे वागत असेल तर त्यांना वठणीवर आणायचे काम पत्रकार, कवी, लेखक, कलावंत, बुद्धी जीवी वर्ग करू शकतो. त्यांना वाचनातून लढण्याचे बळ मिळते.

परदेशी लेखक थॉमस पेन यांचे कॉमन सेन्स पुस्तकातून प्रेरणा घेऊन महात्मा फुले यांनी समतेची क्रांती केली. जगभरात क्रांती घडवून आणण्याचे काम पुस्तकांनी केले आहे. वाचन चळवळचा लढा राज्यभर नेण्यासाठी आम्ही पालखीचे भोई होऊ, त्याचे संयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाऩने करावे, युवा पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून परिवर्तन घडवून आणणारी छोटी पुस्तके प्रकाशित करावीत,असे ही यादव यांनी सांगितले.

मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी अनेक उपक्रम राबविले पाहिजे

डॉ. कार्व्हालो म्हणाल्या, वाचन केले तर समाज समृद्ध होत असतो. वाचनाची गोडी मुलांना लावण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले पाहिजे. जगातील क्रांती पुस्तकामुळे झाल्या आहेत. तसेच काकड म्हणाले, सरकार गावात सार्वजनिक ग्रंथालय सक्षम करण्यासाठी काम करत आहे. ग्रंथालय डिजिटल करण्याचा प्रयत्न करत आहे. पुस्तकांची युवा पिढीला गोडी लागावी यासाठी पुस्तकाचे गाव ही संकल्पना राबविण्यात आली आहे. राज्यात ११ हजार ग्रंथालयांना अनुदान दिले जाते.

वाचकाभिमुख ग्रंथालय ही काळाची गरज

वाचकाभिमुख ग्रंथालय ही काळाची गरज असून, डिजिटल माध्यमाचा वाचनावर प्रभाव पडला आहे. वाचन संस्कृतीचे महत्व व विकास युवा पिढीत रुजविण्याची गरज आहे, असे काकड यानी सांगितले.

चर्चासत्रात रसिकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. सिद्धी जगदाळे, साहित्यिक किरण येले यांनी उत्तरे दिली. एकदिवसीय परिसंवादाचे निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे होत्या. संयोजन ग्रंथालय संसाधन व ज्ञानोपासक अनिल पाझारे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले, सरचिटणीस हेमंत टकले यांनी केले होते.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

येरवडा कारागृहात रक्षाबंधन साजरा ; राखी बांधल्याने भारावून गेले कैदी आधार फाऊंडेशन व सत्यवीर मित्र मंडळ ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.