Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जप्त केलेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष; दौंडमध्ये वकिलाकडून मित्राची १५ लाखांची फसवणूक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 27 December 2023, 15:52

संदीप टूले

केडगाव : दौंड न्यायालयात जप्त केलेल्या सोन्याचा लिलाव होणार आहे. माझी न्यायाधीश साहेबांशी ओळख आहे, शिवाय माझी न्यायालयात चांगली सेटिंग आहे. त्यामुळे मी तुम्हाला स्वस्तात सोने मिळवून देतो, असे आमिष दाखवून शहरातील एका वकिलाने आपल्याच मित्राची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सज्जन मारुती काकडे (रा. नवगिरे वस्ती, दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अ‍ॅड. सनी अजित बलदोटा (रा. गजानन सोसायटी, दौंड) या वकिलाविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून २०२३ ते १९ जुलै २०२३ दरम्यान फिर्यादींनी वकील सनी अजित बलदोटा याला वेळोवेळी पैसे दिले. फिर्यादी व वकील सनी बलदोटा यांची चांगली मैत्री होती. ते एकमेकांना आर्थिक मदत करीत असत. जून २०२३ मध्ये सनी अजित बलदोटा फिर्यादी यांच्याकडे आला व म्हणाला की, दौंडमधील न्यायालयामध्ये जप्त केलेल्या सोन्याचा लिलाव होणार आहे. माझी तेथे सेटिंग असल्यामुळे मी बऱ्याच लोकांना सोने, गाड्या तसेच इतर वस्तू स्वस्तात मिळवून दिल्या आहेत. मी लिलावामधील ६० तोळे सोने २५ हजार रुपये तोळ्याप्रमाणे तुम्हाला मिळवून देतो. तुम्ही १५ लाख रुपयांची तजवीज करून ठेवा. लिलाव झालेली रीतसर पावती सुद्धा कोर्टामधून तुम्हाला मिळवून देतो. तुम्हाला कायदेशीर अडचण येणार नाही, असे सनी अजित बलदोटा याने फिर्यादीस सांगितले.

 

फिर्यादीने त्याच्यावर विश्वास ठेवून सुरुवातीला ९ लाख ८० हजार रुपये त्याच्या बँक खात्यावर जमा केले. त्यानंतर पुन्हा २ लाख ५० हजार रुपये व २ लाख ७० हजार रुपये नातलग व मित्रांकडून उसने घेऊन सनी बलदोटा याला फिर्यादी यांनी दिले. फिर्यादी यांनी १९ जुलै २०२३ पर्यंत तब्बल १५ लाख रुपये सनी अजित बलदोटा याला दिल्यानंतर सोने लिलावाबाबत विचारणा केली. त्यावर ‘अद्याप लिलाव झालेला नाही, लवकरच लिलाव होणार आहे, लिलाव झाला की तुम्हाला सोने मिळवून देतो’, असे सांगून बलदोटा वेळ मारून नेत होता. त्यामुळे फिर्यादींना शंका आली. त्यांनी सोन्याच्या लिलावाबाबत माहिती घेतली असता त्यांना असे समजले की, दौंड न्यायालयात अशा प्रकारचा कोणताही लिलाव होत नाही.

दरम्यान, सत्य समजल्यावर फिर्यादी यांनी सनी बलदोटा याला भेटून ही हकीकत सांगितली व माझे पैसे परत करा, नाहीतर तुमच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे सनी बलदोटा याने फिर्यादींना १५ लाख रुपयांचा धनादेश दिला. फिर्यादींनी धनादेश बलदोटा यांच्या बँकेमध्ये दाखविला असता, त्या खात्यावर रक्कम नाही अशी माहिती मिळाली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी वकील सनी अजित बलदोटा यांच्याविरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश अबनावे करीत आहेत.

स्वस्तात सोने घेऊन देतो, असे आमिष दाखवून दौंड शहर तसेच विविध भागांमध्येही फसवणुकीचे प्रकार घडल्याची चर्चा आहे. पोलीस प्रशासनाने जर अशा घटनांचा कसून तपास केला तर अनेक आर्थिक फसवणुकीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post
KL Rahul Scored Century In Centurion, Became The Real Troubleshooter For The Team

IND vs SA: केएल राहुलचे सेंच्युरियनमध्ये शानदार शतक, संघाला संकटातून बाहेर काढत बनला ट्रबल-शूटर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.