Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलीस सोसायटी संचालक पदावर पुणे ग्रामीण पोलीस दलातील महेश गायकवाड यांची निवड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 21 June 2024, 22:09

पुणे : स्वातंत्र पूर्व काळात २० जुन १९२० रोजी पोलीसांसाठी सहकार तत्वावर चालणारी दि पुना डिस्टीक्ट पोलीस को-ऑप. क्रेडीट सोसायटी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेची व्याप्ती वाढत असून आजतयागत संस्थेचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, सीआयडी, एसआयडी, ॲन्टी करप्शन ब्युरो, एसआरपीएफ, वायरलेस, पोलीस प्रशिक्षण केंद्र व इतर विभागातील पोलीस अधिकारी, अंमलदार व कार्यालयीन स्टाफ असे एकूण १४,३०० सभासद आहेत.

 

संस्थचे अधिकृत भागभांडवल सुमारे ५०० कोटी रुपये असून संस्थेचा दरवर्षी ऑडीट वर्ग ‘अ’ दर्जा आहे. संस्थेची सन २०२४-२०२९ कालावधीची पंचवार्षिक निवडणूक ६ मार्च २०२४ रोजी पार पडलेली आहे. त्यामध्ये नवपरिवर्तन पॅनल १२ विरुध्द १ असा बहुमताने विजयी होवून नवनिर्वाचित १३ उमेदवार निवडून आले आहेत.

गुरुवार २० जुन २०२४ रोजी संस्थेच्या १०४ वा वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सभासदांना अथर्व नेत्रालय अँड रिसर्च प्रा. लि. यांचेतर्फे नेत्रतपासणी व डायबेटीक असोशिएशन ऑफ इंडीया तर्फे मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा सेवानिवृत्त कर्मचारी व सभासद यांनी लाभ घेतला.

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष सागर घोरपडे, उपाध्यक्ष आकाश फासगे, खजीनदार उदय काळभोर यांचे उपस्थितीत घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व संचालकांनी ठराव घेवून सर्वानुमते संस्थेचे सभासद महेश वसंतराव गायकवाड यांची ‘तज्ञ संचालक’ या पदावर बिनविरोध निवड केली.

नवनिर्वाचित तज्ञ संचालक महेश गायकवाड हे पुणे ग्रामीण पोलीस दलात सायबर क्राईम या विभागात कार्यरत असून त्यांनी यापूर्वी लोणी काळभोर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा येथे आपले कार्याचा ठसा उमटविलेला आहे. त्यांना यापूर्वी पोलीस दलातील चांगल्या कामगिरीबद्दल मा. पोलीस महासंचालक पदक देवूनही गौरविण्यात आलेले आहे. पोलीस सोसायटी कामकाजही ते उत्कृष्टपणे करतील याची खात्री असल्यानेच त्यांची या पदावर निवड केल्याचे दिसून येते.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित संचालक महेश गायकवाड म्हणाले कि, दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीचा नावलौकिक वाढविण्यासाठी व सभासदांच्या हक्कांसाठी प्रामाणिक व गतिमान प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही महेश गायकवाड यांनी दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15
Next Post

कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.