Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पराभव ही आगामी निवडणुकांची नांदी: माजी आमदार संजय जगताप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 December 2024, 11:01

-बापू मुळीक

 

सासवड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी लढून विधानसभेचा पराभव पुसून टाकू. येणारी वर्षे तुमची असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम करणार आहे. पराभव झाला असला तरी जनतेने एक लाखांहून अधिक मतदान करून भक्कम साथ दिली आहे. यापुढेही सामाजिक कामांच्या माध्यमातून जनतेची कामे करू. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व नेते, कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा पराभव ही आगामी निवडणुकांची नांदी आहे. मला ही निवडणूक जिंकता आली नसली तरी तुम्हाला विजयी करण्याची ताकद माझ्यात आहे. यासाठी आपापसातील हेवेदावे बाजूला करून सर्वांनी ताकदीने एकत्र येऊ, असे आवाहन पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी केले.

सासवड येथे गुरूवारी ( दि. 05) रोजी आयोजित आभार मेळाव्यात माजी आमदार संजय जगताप बोलत होते. ईव्हीएम मशीनबाबत बोलताना 5 टक्के म्हणजे 21 व्ही व्ही पॅट मधील चिठ्ठ्या मोजण्याबाबत निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. 413 बुथ पैकी 117 बुथवर मतांची आघाडी आहे. त्या सर्व मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार. आता लबाडांना खड्यासारखे बाजूला करायचे आहे यासाठी सर्वांनी वेळोवेळी माहिती द्यावी. मी आता जरी कमी पडलो असलो तरी यापुढे कमी पडणार नाही. काही झाले तरी पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांत या ठिकाणी दुसर्‍या कोणालाही निवडून येऊ देणार नाही. आपण स्व. चंदुकाका जगताप यांचे वारसदार असून पराभवाने न खचता लढणे आपल्या रक्तात आहे. त्यामुळे मी खचलो नाही. पुन्हा नव्या उभारीने जनतेत येत आहे. कोणत्याही निवडणूका अवघड नाहीत. आपली संस्थात्मक रचना मजबूत असल्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रचारप्रमुख सुदाम इंगळे, माणिक झेंडे, दिनकर हरपळे, नंदकुमार जगताप, बाळासो हरपळे, बाजीराव कुंजीर, कल्याण जेधे, संजय हरपळे, गौरी कुंजीर, सुनील धिवार, राजवर्धिनी जगताप, सुनिता कोलते यांसह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

विशाल हरपळे, पी एस मेमाणे, पुर्वाराणी जगताप, हरीदास खेसे, संकेत जाधव, विजय अधिकारी, महादेव टिळेकर, बळवंत गरूड, नाथा कुंभारकर, प्रमोद कारकर, श्रीकांत लक्ष्मीशंकर, सुरेखा ढवळे, संजय टिळेकर, सुरज गदादे, राऊत, धर्माजी गायकवाड, मंजुषा गायकवाड, राजेंद्र जगताप, माणिक चोरमले, अनिल जगताप, मुरलीधर झुरंगे, संदीप जगदाळे आदींनी जनतेच्या मनातील आमदार संजय जगताप हेच असल्याचे सांगत मतदान यंत्राबाबतची शाशंकता, बंडखोर, कमी पडलेले कार्यकर्ते, लाभाच्या योजना, बुथवरील मतदानाचे अवलोकन, तळातील व नवीन कार्यकर्त्यांना बळ आदींबाबत विवेचन करून ‘लढेंगे..जितेंगे’ च्या घोषणा दिल्या.

प्रदीप पोमण यांनी प्रास्ताविक केले तर विठ्ठल मोकाशी यांनी आभार मानले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

पुणे सोलापूर महामार्गावरील चौफुला येथे तिहेरी वाहनाचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.