Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rupali Thombre: रुपाली ठोंबरेंना अजित पवार गटाकडून आणखी एक धक्का! ठोंबरेंना डावलून पुन्हा चाकणकरांना संधी…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 13 November 2025, 14:36
Rupali Thombre: Another blow to Rupali Thombre from Ajit Pawar group! Chakankar gets another chance after leaving Thombre...

Photo-Social Media

पुणे: गेल्या काही दिवसांपूर्वी ठोंबरे विरुद्ध चाकणकर (Rupali Thombre) हा वाद चांगलाच (Rupali Chakankar) पेटला होता. या वादाने महाराष्ट्राच्या (Ajit Pawar) राजकारणात चांगलीच खळबळ माजवली आणि अनेक चर्चांना उधाण आलं होत. फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक वक्तव्य केलं होत आणि त्या वक्तव्याविरोधात रुपाली ठोंबरे यांनी विविध माध्यमांवर आपली भूमिका मांडली. त्यांच्या याच भूमिकेमुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या प्रवक्तेपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

 

हा धक्का पचवत असतांनाच आता अजित पवार गटाने रुपाली ठोंबरेंना आणखी एक धक्का दिला आहे. त्यांना आता पुन्हा एकदा गटाच्या महत्वाच्या जबाबदारीमधून डावलण्यात आलं आहे तर त्या जागी रुपाली चाकणकरांना संधी देण्यात आली आहे. आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोमाने तयारी सुरु असतांनाच राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने त्यांची ४० स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी ही यादी जाहीर केली असून या यादीमधून ठोंबरेंना जाणीवपूर्वक वगळल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. विशेष बाब म्हणजे रुपाली ठोंबरेंच्या जागी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना ते स्थान देण्यात आलं आहे.

रुपाली ठोंबरेंना डावलण्याची ही अजित पवार गटाची दुसरी वेळ असल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात ‘सगळं आलबेल’ नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटवल्याने चर्चा सुरु होत्या तर पक्षाकडून रुपाली ठोंबरेंना काही सूचक सूचना देण्यात आल्याचंही सांगितलं जात होतं.

तटकरे यांनी जाहीर केलेल्या यादीत अनेक स्टार प्रचारकांच्या समावेश आहे. तसेच अनेक प्रभावशाली आणि वरिष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, तसेच मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

यादीत नवाब मलिक, धर्मराव आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रताप पाटील-चिखलीकर, अमोल मिटकरी, सना मलिक-शेख, समीर भुजबळ, इद्रीस नायकवडी, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन, सिद्धार्थ कांबळे, सुरज चव्हाण, कल्याण आखाडे, सुनिल मगरे, नाझेर काझी, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर यांचाही समावेश करण्यात आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
Next Post

शरीरावर अनेक ठिकाणी गाठी आल्यात का? जाणून घ्या काय आहे कारण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.