Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : प्रचाराला आलेल्या उमेदवाराला गेटवरच अडवलं! पुण्यात सोसायटीत मोठा राडा; वॉचमनशी हुज्जत, प्रकरण थेट पोलिसात!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 January 2026, 18:06
Pune

photo- ai

Pune : “ताई, माई, अक्का पक्का विचार करा… आला रे आला, आपला माणूस आला…” अशा घोषणा देत प्रचाराचा माहोल रंगात आला असतानाच, कर्वेनगरमधल्या एका सोसायटीत मात्र उमेदवाराला गेटवरच थांबावं लागलं. प्रचारासाठी आलेल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना सोसायटीच्या वॉचमनने थेट प्रवेश नाकारल्याने वादाला सुरुवात झाली आणि हे प्रकरण थेट पोलिस चौकीपर्यंत जाऊन पोहोचलं.

 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते घरोघरी फिरून प्रचार करत आहेत. पण काही भागांत प्रचार करताना त्यांना अडथळ्यांना सामोरं जावं लागतंय. कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी प्रभागात जिजाई गार्डन परिसरातील एका सोसायटीतच प्रचाराला बंदी घालण्यात आली होती. या सोसायटीत आलेल्या एका उमेदवाराला आणि त्याच्या समर्थकांना वॉचमनने अडवून,

“कोणालाही आत प्रवेश नाही,” असं स्पष्ट सांगितलं. यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला.

प्रचारकर्त्यांनी सोसायटीच्या सेक्रेटरीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण सेक्रेटरीचा नंबरही देण्यात आला नाही, त्यामुळे तणाव आणखी वाढला. अखेर उमेदवाराने पोलिसांच्या 112 हेल्पलाईनवर फोन करून मदत मागितली.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती पाहिल्यानंतर पोलिसांनी उमेदवाराला सांगितलं की,
“जर सोसायटीनेच असा निर्णय घेतला असेल, तर आम्ही फारसं काही करू शकत नाही.” तरीही काही तक्रार असेल तर रामनगर पोलिस चौकीत लेखी तक्रार द्या, असा सल्ला देण्यात आला.

दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या काळात अशा प्रकारचे वाद वाढताना दिसत आहेत. अनेक सोसायट्या ‘खासगी मालमत्ता’ असल्याचं कारण देत प्रचाराला मज्जाव करत आहेत. त्यामुळे प्रचाराचा हक्क आणि सोसायटीचे अंतर्गत नियम यामध्ये थेट संघर्ष निर्माण होत आहे.

घरफोडी, चोरीसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक सोसायट्यांमध्ये सुरक्षेचे नियम कडक करण्यात आले आहेत. रहिवाशांखेरीज बाहेरच्यांना थेट प्रवेश नाकारला जातो. याच नियमांचा फटका आता उमेदवारांच्या प्रचारालाही बसत आहे.

काही सोसायट्यांमध्ये आधी परवानगी घ्यावी लागते, ठराविक वेळेतच प्रचार करता येतो, उमेदवारासोबत फक्त 1-2 कार्यकर्त्यांनाच प्रवेश दिला जातो. असं चित्र असल्याचं उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune

Pune : सुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचे पालन हेच 'सुरक्षा कवच'! एमआयटी एडीटी विद्यापीठात पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदेंचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.