Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी नऊ तर नगरसेवकासाठी तब्बल 146 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 22 November 2025, 14:55
Pune News: Nine candidates are in the fray for the post of mayor and 146 for the post of corporator of the Fursungi-Uruli Devachi Municipal Council.

लोणी काळभोर: फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेच्या (Pune News) नगराध्यक्षपदासाठी नऊ तर (Fursungi News) नगरसेवकासाठी 146 उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या परिषदेसाठी द्विसदस्य पद्धतीने निवडणूक होणार असून, एकूण प्रभाग संख्या 16 असून नगरसेवकांची संख्या 32 असणार आहे. या निवडणुकीत साम, दाम, दंड व भेद ही आयुधे वापरली जाणार असल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. (Breaking News)

 

फुरसुंगी उरळीदेवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने स्वबळावरती सर्व जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे भाजप शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) युती झाली आहे. मात्र त्यांच्यामध्ये काही प्रभागात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विना तंटा आपले उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शिवतारे व जगताप यांची युती व महाविकास आघाडी आणि अजित पवार यांचा पक्ष अशी तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे.

फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषदेची थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि 16 प्रभागातून 32 नगरसेवकासाठी निवडणुक 2 डिसेंबर रोजी होत आहे. निवडणुकीच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट ( युती ) व महाविकास आघाडी अशा तिघांमध्ये नगराध्यक्षा पदासह लढत होणार आहे. काही ठिकाणी भाजपचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवारांनी माघार घेतली तर काही ठिकाणी युतीमध्ये मैत्री पूर्ण लढत होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने सुरुवातीपासूनच मातब्बर उमेदवार आपल्या पक्षात घेऊन 32 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा स्वतंत्र उमेदवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, युती आणि महाविकास आघाडी या तिघांमध्ये लढत होणार आहे. स्थानिक युतीमध्ये पाच प्रभागात दोन्ही पक्षातील काही उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र स्थानिक भाजपचे जुने कार्यकर्ते असल्याने भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी आमचे उमेदवार माघार घेणार नाहीत, असे सांगितल्याने दोन्ही पक्षाच्या स्थानिक उमेदवारांमध्ये जुळवा जुळव न झाल्याने मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी सांगितले, फुरसुंगी उरळीदेवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीत युती झाली आहे. शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असणार आहे. आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले की,आमच्या दोन्ही पक्षाची युती झाली आहे. काही ठिकाणी स्थानिक भाजपच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी विनंती पूर्वक प्रयत्न केले मात्र जुळवा जुळव शेवट परत झाली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील 14 नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी 34, तर सदस्यपदासाठी 598 जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे एकूण वैध ठरलेल्याअर्जांपैकी आता 1585 उमेदवार सदस्यपदासाठी, तर नगराध्यक्षपदासाठी 110 उमेदवार रिंगणात आहे. जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी बारामतीत सर्वाधिक 14 अर्ज आले असून सदस्यपदासाठी 165 उमेदवार रिंगणात आहेत. तर फुरसुंगी उरळीदेवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार जाहीर केले आहेत.

फुरसुंगी उरुळीदेवाची नगराध्यक्षपदाचे पक्षाचे उमेदवार
1) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष – संतोष सरोदे
2) शिवसेना एकनाथ शिंदे गट ( भाजप सोबत युती) – महेंद्र सरोदे
3) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस यांच्यावतीने शिवसेना उबाठा चे अधिकृत उमेदवार – संतोष उर्फ सनी कांबळे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील आईस्क्रिम पार्लरचे दुकान फोडून चोरट्यांनी 16 हजारांवर मारला डल्ला

Tuesday, 7 April 2026, 17:16

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19
Next Post
Leopard News

Leopard News : दौंडमध्ये बिबट्यांची प्रचंड दहशत! ९ पिंजरे, ३० कॅमेरे तैनात, वनविभागाचा 'मास्टर प्लॅन' रेडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.