Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Mumbai Expressway : एक्सप्रेस वे ठप्प, यंत्रणा हतबल! एका टँकरने घातला २२ किमीचा वेढा; मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला अपघाताचा अहवाल.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 February 2026, 19:38
Pune Mumbai Expressway

photo- social media

Pune Mumbai Expressway : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघाताने अवघा एक्सप्रेस वे तब्बल दीड दिवस ठप्प केला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी उलटला. सुदैवाने मोठा स्फोट टळला, पण गॅसगळतीमुळे परिस्थिती अतिशय धोकादायक बनली. (Pune Mumbai Expressway)

 

सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने तात्काळ दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केली. परिणामी एक्सप्रेस वे आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही ठिकाणी २२ ते २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. आडोशी बोगद्यापासून थेट बऊर गावाच्या हद्दीपर्यंत गाड्या रेंगाळत होत्या. हजारो प्रवासी, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण रस्त्यावर तासन्‌तास अडकले. अनेकांचे फ्लाइट चुकले, तर मुंबईकडे जाणारा भाजीपाला आणि शेतमाल अडकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता अपघात झाल्यानंतर गॅसगळती थांबवण्यासाठी रात्री तज्ज्ञ पथक दाखल झाले. मात्र गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने काम सावकाश करावं लागलं. बुधवारी दुपारी दुसऱ्या टँकरमध्ये गॅस भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि रात्री उशिरा टँकर बाजूला करून एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली.

या संपूर्ण घटनेचा सखोल अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. “सामान्यतः अशा घटनांवर ८ तासांत प्रतिसाद दिला जातो. मात्र यावेळी गॅस अतिशय धोकादायक असल्याने वेळ लागला. पुढे असे अपघात टाळण्यासाठी एसओपी तयार करणार आहोत, चालकांसाठी विशेष कार्यशाळाही घेतली जाईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

हा अपघात केवळ एक वाहन उलटल्याची घटना नाही, तर द्रुतगती मार्गावरील सुरक्षाव्यवस्था, धोकादायक रसायन वाहतूक आणि आपत्कालीन व्यवस्थापन यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post

सत्ताधाऱ्यांकडून ‘गाव भकास अन् स्वतःचा विकास’; माजी सरपंच नंदू काळभोर यांची विरोधकांवर जोरदार टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.