Pune Mhada Lottery 2025 : म्हाडा पुणे मंडळाने काढलेल्या ४,१८६ घरांच्या सोडतीला यावर्षी जबरदस्त प्रतिसाद मिळालाय. आतापर्यंत तब्बल १,८२,७८१ लोकांनी ऑनलाईन अर्ज केले असून त्यापैकी १,३३,८८५ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज पूर्णही केलेत. म्हणजे एका घरासाठी सुमारे ४३ जण स्पर्धेत आहेत. Pune Mhada Lottery 2025

ही सोडत सप्टेंबरमध्ये जाहीर झाली होती. यामध्ये २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३,२२२ घरे आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील ८६४ घरांचा समावेश आहे. पुणे आणि परिसरात स्वतःचं घर घेण्याची लोकांची मोठी मागणी यावरूनच दिसते. अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी आल्याने आणि कागदपत्र तपासणीमध्ये विलंब झाल्याने म्हाडाने अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
आता ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ (रात्री ११:५९) अशी ठेवण्यात आली आहे. तर RTGS\NEFT द्वारा पैसे भरणाऱ्यांसाठी अंतिम मुदत १ डिसेंबर २०२५ आहे. संगणकीय सोडत ११ डिसेंबर २०२५ दुपारी १२ वाजता होणार आहे. pune mhada lottery 2025
म्हाडाने स्पष्ट केलं आहे की ही अर्ज करण्याची शेवटची संधी आहे आणि कुणीही एजंट किंवा दलालांच्या मागे लागू नये. सोडत पूर्णपणे संगणकीय आणि पारदर्शक असेल. मुदतवाढ मिळाल्यामुळे अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. pune mhada lottery 2025
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घराच्या शोधात असलेल्या हजारो लोकांसाठी ही सोडत मोठी आशा बनली आहे. म्हाडाने दिलेल्या या मुदतवाढीमुळे अनेकांना अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आता अर्जदारांनी ३० नोव्हेंबरपूर्वी आपला फॉर्म पूर्ण करून ११ डिसेंबरच्या सोडतीत नशीब आजमवण्याची संधी गमावू नये, असंच आवाहन करण्यात आलं आहे.







