पुणे: पिंपरी-चिंचवड (Pune Mahapalika Election) आणि पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी (Pimpri-Chinchwad Mahapalika Election) मतदानाला आता अवघे काही दिवस (Pune Election) शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pune Politics) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी, इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. (Latest Marathi News)

महागड्या भेटवस्तूंच आमिष
विशेषतः पिंपरी-चिंचवडमधील काही धनाढ्य उमेदवारांनी यंदा निवडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद वापरल्याचे चित्र दिसत आहे. विकासकामांचे मुद्दे मागे पडताना दिसत असून, मतदारांना महागड्या भेटवस्तू आणि आमिषे दाखवून आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे आणि उमेदवारी मिळवण्यासाठी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी काही इच्छुकांकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याची चर्चा आहे.
गाड्या, थायलंड टूर अन् बरंच काही…
पुणे महापालिकेच्या काही प्रभागांमध्ये मतदारांना चारचाकी गाडी, परदेश सहल, जमीन अशा आकर्षक ऑफर्स दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे. कसबा परिसरातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये पैठणीचा खेळ जिंकणाऱ्या महिलांना हेलिकॉप्टर राईड देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. लोहगाव-धानोरी परिसरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये एका इच्छुक उमेदवाराने लकी ड्रॉद्वारे 11 गुंठे जमिनीचे प्लॉट देण्याची घोषणा केली असून, त्यासाठी नोंदणी प्रक्रियाही राबवण्यात आली आहे.
पैठण्यांचं वाटप
विमाननगर परिसरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये काही इच्छुक उमेदवारांकडून जोडप्यांसाठी थायलंडमधील फुकेत-क्राबी येथे 5 दिवसांची सहल आयोजित करण्याची ऑफर देण्यात आली आहे. अनेक प्रभागांमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एसयूव्ही कार, दुचाकी, तसेच सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवले जात आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘होम मिनिस्टर’सारखे कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणावर पैठणी साड्यांचे वाटप केले जात आहे.
आमिषांचे राजकारण
याशिवाय क्रिकेट लीगसारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे दिली जात आहेत. काही भागांमध्ये महिलांना शिवणयंत्रे तर मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. या सर्व प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेतील पैशाचा वाढता वापर आणि आमिषांचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.







