Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: उरुळी कांचन येथे अवैध मद्य साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई तब्बल पाऊणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपी अटकेत

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 18 December 2025, 19:13

उरुळी कांचन: नूतन वर्षाच्या (Uruli Kanchan News) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, के विभागाच्या पथकाने उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात मद्यसाठा वाहतुकीवर धडक कारवाई केली. या कारवाईत मद्य व वाहनांसह तब्बल 4 लाख 79 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

 

वाहनचालक विलास बाळासाहेब चव्हाण (रा. मंत्री मार्केट, हडपसर, पुणे), राजू दादासाहेब केकान (मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) सध्या रा. कोलवडी, ता. हवेली) व या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हनुमंत रामभाऊ रोकडे (रा. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त घालीत होते. गस्त घालीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी (ता. 13) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन गावाच्या हद्दीतील एलाईट हॉटेलसमोर, पुणे–सोलापूर रोडवर संशयित चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान हुंदाई कंपनीची आय-10 चारचाकी या वाहनातून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या तसेच बनावट विदेशी मद्याच्या 24 बाटल्या असा साठा आढळून आला. याप्रकरणी वाहनचालक विलास चव्हाण यास अटक करण्यात आली. त्याच्याकडे सदर मद्य प्रकरणी चौकशी केली असता हा मुद्देमाल राजू केकान याच्याकडून मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुढील तपासात या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हनुमंत रोकडे यास अटक करण्यात आली.

दरम्यान, घटनास्थळी व रिकव्हरी दरम्यान एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक चारचाकी वाहन व इतर साहित्य असा तब्बल 4 लाख 79 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता बुधवार पर्यंत पोलीस कोठडी, तर मंगळवारी (ता. 30) दरम्यान मॅजिस्ट्रेट कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदर कारवाईत निरीक्षक पांडुरंग पाटील, दुय्यम निरीक्षक पी.टी. पडवळ, प्रियंका कारंडे, एस.के. हाके, सहायक निरीक्षक विकास थोरात तसेच जवान शुभम भोईटे, गोपाळ कानडे, किसन पावडे, स्नेहा कांबळे, गौरी शहाणे व शरद हांडगर यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक पांडुरंग पाटील करीत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागरिकांना आवाहन
जिल्ह्यातील दोन महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी परराज्यातील स्वस्त दारू येण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 21 पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. सराईत गुन्हेगारांवर विशेष पाळत, रात्रगस्त व वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अतुल कानडे यांनी दिले आहेत. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.

अवैध मद्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००-२३३-९९९९ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२७३२१ वर संपर्क साधावा, असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post
Pune news

Pune News : पुण्याचं जेवण नडलं? स्टार फलंदाज जयस्वालची प्रकृती बिघडली; 'त्या' रिपोर्टमधील माहितीने खळबळ, आता खेळण्यावर प्रश्नचिन्ह?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.