Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: उरुळी कांचन येथील लँड डेव्हलपरला 10 टक्के परताव्याचे आमिष दाखवून एकाने घातला 12 कोटींचा गंडा

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 13 March 2026, 15:59
Uruli Kanchan News: A man duped a land developer in Uruli Kanchan of Rs 12 crores by promising a 10 percent return.

लोणी काळभोर, ता. 13 : गुंतवणुकीवर अवघ्या काही दिवसांत 4 ते 10 पट परतावा (Uruli Kanchan News) मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील लँड डेव्हलपरला 12 कोटी 60 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पूर्व हवेलीत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आशिष एकनाथ कांचन (वय 39, रा. एरिगेशन कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रविण तुळशीराम संकपाळ (रा. प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग, वाशी, नवी मुंबई) आणि त्याच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष कांचन हे 2008 पासून जमीन खरेदी-विक्री व लँड डेव्हलपिंगचा व्यवसाय करतात. व्यवहारात कधी कधी त्यांचा पुतण्या अभिषेक अरविंद कांचन हा भागीदार म्हणून सोबत असतो. मार्च 2022 मध्ये अभिषेक कांचनच्या ओळखीतील व्यक्तींमार्फत आशिष कांचन यांची प्रविण संकपाळ याच्याशी कवडीपाट येथील जयश्री हॉटेलमध्ये भेट झाली. त्या वेळी संकपाळ याने स्वतःची ओळख करून देताना एमआयडीसी परिसरात कंपन्यांसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत असल्याचे सांगितले. विविध नामांकित कंपनी मालकांशी संबंध असल्याचे सांगत त्याने काही फोटोही दाखवले.

याचवेळी त्याने एमआयडीसी परिसरातील जमिनीत गुंतवणूक केल्यास 4 ते 10 पट नफा मिळतो, असे सांगत कांचन यांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. आरोपी संकपाळच्या बोलण्यावर विश्वास ठेवून 23 मार्च 2022 रोजी कांचन यांनी 50 लाख रुपये आरटीजीएसद्वारे त्याच्या कंपनीच्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच संकपाळने त्यांना पुन्हा जयश्री हॉटेलमध्ये बोलावून 25 लाख रुपये रोख नफा दिला. अतिशय कमी कालावधीत इतका मोठा परतावा मिळाल्याने कांचन यांचा संकपाळवर विश्वास बसला.

यानंतर 30 मार्च 2022 रोजी झालेल्या दुसऱ्या भेटीत संकपाळने आंध्रप्रदेशातील पेंडुकोडा येथे किया कंपनीसमोर 28 एकर जागेवर लॉजिस्टिक गोडाऊन प्रकल्प उभारण्याचे स्वप्न दाखवले. या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठा फायदा मिळेल, असे सांगत त्याने 4 कोटी 85 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले.आरोपी संकपाळवर विश्वास ठेवून 5 एप्रिल ते 11 एप्रिल 2022 दरम्यान आशिष कांचन व अभिषेक कांचन यांनी विविध बँक खात्यांतून 4.85 कोटी रुपये त्याच्या कंपनीच्या खात्यात वर्ग केले.

एप्रिल ते ऑगस्ट 2022 दरम्यान संकपाळने वारंवार अधिक गुंतवणुकीची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी आशिष कांचन व त्यांच्या भागीदाराने वेळोवेळी एकूण 12 कोटी 60 लाख 55 हजार रुपये त्याच्या वैयक्तिक आणि कंपनीच्या बँक खात्यांवर वर्ग केले. या गुंतवणुकीच्या बदल्यात डिसेंबर 2022 पर्यंत 35 कोटी रुपयांपर्यंत परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

दरम्यान, गुंतवणुकीची सुरक्षा म्हणून संकपाळने प्रत्येकी 5 कोटी रुपयांचे तीन चेक दिले होते. मात्र 5 नोव्हेंबर 2022 रोजी भरलेला चेक खात्यात रक्कम नसल्याने बाउन्स झाला. त्यानंतर पुन्हा 28 नोव्हेंबर 2023 रोजी दुसरा चेक भरला असता तोही खाते बंद असल्याने वटला नाही. चेक बाउन्स झाल्यानंतर संकपाळने वारंवार वेगवेगळी कारणे देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. चौकशीदरम्यान त्याने 15 जून 2025 पर्यंत केवळ 61 लाख 40 हजार रुपये ऑनलाइन परत केले, मात्र उर्वरित 11 कोटी 99 लाख 15 हजार रुपये दिली नाही.

या प्रकरणी आशिष कांचन यांनी आर्थिक गुन्हे शाखेत दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार प्रविण तुळशीराम संकपाळ व त्याची कंपनी हरेकृष्णा इंडस्ट्रियल अॅन्ड लॉजिस्टिक पार्क्स प्रा. लि. यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 316 (2), 316 (3) आणि 318 (4) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, कोट्यवधी रुपयांच्या या गुंतवणूक फसवणुकीमुळे व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Daund News: Midnight terror in Daund! Three unknown thieves entered the house from the terrace; Property worth Rs. 2.25 lakhs looted

Daund News: दौंडमध्ये मध्यरात्री थरार! तीन अज्ञात चोरटे गच्चीवरून घरात घुसले; सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.