Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: कोरेगाव मूळ येथे 20 वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून निर्घुण खून, डोक्यात, तोंडावर केले गंभीर वार; हल्ल्याचे कारण अस्पष्ट

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 15 October 2025, 9:42

उरुळी कांचन, (पुणे): कोरेगाव मूळ – प्रयागधाम (Uruli Kanchan News) रस्त्यावर अज्ञात इसमांनी एका 20 वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. मंगळवारी (ता. 14) रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घडलेल्या घटनेने कोरेगाव मूळ, उरुळी कांचनसह परिसरात खळबळ उडाली. अवघ्या काही मिनिटांत तरुणीच्या खुनाची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पूनम विनोद ठाकूर (वय -20. रा. गगन आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. मृत तरुणीच्या तोंडावर दगडाने मारहाण करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार, तीच्या डोक्यातही मोठ्या जखमा झाल्या होत्या यावेळी घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. याप्रकरणी मृत तरुणीचा भाऊ मनीष विनोद ठाकूर (वय- 23) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम ठाकूर हि उरुळी कांचन येथील एका मेडिकल मध्ये कामाला जात होती. बुधवारी रात्री कोरेगाव मूळ – प्रयागधाम रस्त्यावर अज्ञात इसमांनी तीच्यावर दगडाने जोरदार हल्ला चढवला. यामध्ये तरुणीच्या तोंडावर व डोक्यात मोठ्या जखमा झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित तरुणीला उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी संगितले. यावेळी खून झालेल्या ठिकाणी पूनम वापरत असलेली पर्स, चप्पल, पाण्याची बॉटल, मोबाईल फोन अशा वस्तू आढळून आल्या आहेत. खून कोणत्या कारणामुळे झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नसून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून आरोपींच्या शोध घेण्यासाठी  पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

 

सदर ठिकाणी पोलीस उपाधीक्षक भाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे अमित सिदपाटील, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, पोलीस कर्मचारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18
Next Post

संतापजनक! अंगावरील कपडे फाडले मग तोंडात कोंबली गर्भनिरोधक गोळी अन् वरच्या मजल्यावर फरफटत नेत केला सामुहिक बलात्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp