उरुळी कांचन, (पुणे): पुणे-सोलापूर महामार्ग (Uruli Kanchan) ओलांडताना भरधाव बल्करच्या भीषण धडकेत एका व्यक्तीचा कुटुंबासमोरच जागीच मृत्यू झाला. रविवारी (ता. 08) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

उत्तम बबन भंडारे (वय -53, रा. शिंदवणे चौक, उरुळी कांचन) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघात एवढा भीषण होती की, बल्कर वाहनाचे टायर थेट त्यांच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि त्यांचा कुटुंबासमोरच जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बल्कर चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील ग्रामदैवत काळभैरवनाथाची जत्रा सुरु आहे. उत्तम भंडारे हे आपल्या कुटुंबियांसमवेत मुलगी व लहान मुलासह उरूस पाहण्यासाठी आले होते. उरूस आटोपल्यानंतर ते घरी परत जात असताना शिंदवणे चौकाजवळ महामार्ग ओलांडत होते. सोलापूरकडे जाणारी बाजू त्यांनी रस्ता सुरक्षितपणे पार केला; मात्र दुसरा रस्ता ओलांडताना सोलापूरहून पुण्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या बल्करने पुढे चालत असलेल्या भंडारे यांना जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, वाहनाचे टायर थेट त्यांच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि त्यांचा कुटुंबासमोरच जागीच मृत्यू झाला. वडिलांचा डोळ्यांसमोर झालेला मृत्यू पाहून मुलगी व लहान मुलगा हादरून गेले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र डोक्यावरून चाक गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला व मृतदेह हा छिन्नविछिन्न अवस्थेत पडला होता. सदरची माहिती उरुळी कांचन पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार वाहतूक कोंडी सोडवून पोलिसांनी बल्कर चालकाला ताब्यात घेतले. त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरु आहे.







