उरुळी कांचन, (पुणे): अज्ञात कारणावरून पेठ (ता. हवेली) येथील एका 60 ते 62 वर्ष वयोगटातील एका व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने धारदार शास्त्राने खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पेठ-वडाचीवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत म्हसोबा मंदिर परिसरात हि घटना शुक्रवारी (ता. 19) उघडकीस आली आहे. दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे आणखी स्पष्ट झालेले नाही. (Uruli Kanchan Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, संपत चौधरी (वय अंदाजे 60 ते 62 रा. पानमळा, वडाचीवाडी, पेठ, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नेमका खून का व कोणी केला याची अद्याप माहिती मिळाली नसून सदरचा खून हा पूर्ववैमन्यासातून झाला असल्याची चर्चा परिसरात आहे.
सदर घटनेची महिती उरुळी कांचन पोलिसांना मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, सहायक फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार प्रवीण चौधर, निलेश जाधव, उद्धव गायकवाड, सुनील सस्ते, रवी फड, अजित काळे, गाडेकर, हे सदर ठिकाणी पोचले असून पंचनामा सुरू झाला आहे.
दरम्यान, घटनास्थळी चौधरी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यत दिसून आला. त्यानंतर ही माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. हा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट झाले नाही. त्यानुसार पोलिसांची पुढील कार्यवाही सुरु आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…






