Urali Kanchan : वाढदिवस म्हटलं की केक कापणं, जल्लोषाचं वातावरण निर्माण होत असतं. या वाढदिवसाच्या निमित्तानं भरमसाठ खर्चही केला जातो. परंतु, उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सागर बाळासाहेब कांचन यांनी आपला वाढदिवस कुठं हॉटेल किंवा लॉन्सवर नाहीतर तुपे वस्तीतील जिल्हा परिषद शाळा व महावीर मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्याबरोबर साजरा केला. (urali kanchan)

वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हा उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून उद्योजक सागर बाळासाहेब कांचन यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तुपे वस्तीतील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल 200 विद्यार्थ्यांना उबदार जर्किंगचे (स्वेटर) व उरुळी कांचन येथील महावीर मतिमंद निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांबरोबर केक कापून आणि खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला.
वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य खर्च करत असतात. मात्र, हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असतो. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत सागर कांचन यांनी हा सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
”सागर कांचन म्हणाले, “माझा वाढदिवस हा उरुळी कांचन येथील जिल्हा परिषद शाळा व महावीर मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर साजरा करण्याचे मनात आलं. त्यामुळेच मी जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसाठी उबदार जर्किंगचे (स्वेटर) वाटप केले. तर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला. या चिमुकल्यांच्याबद्दल माझ्या मनात जे आलं ते मी करून दाखवलं”, असे सागर कांचन यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, यावेळी यशवंत कारखान्याचे संचालक संतोष कांचन, उरुळी कांचनच्या माजी सरपंच ऋतुजा कांचन, दत्तात्रय कांचन, अमित (बाबा) कांचन, मयूर कांचन, भाऊसाहेब कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, भाऊसाहेब तुपे, रामदास तुपे, जितेंद्र बडेकर, सदस्य शंकर बडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव कांचन, भाजपा नेते अजिंक्य कांचन, सामाजिक कार्यकर्ते सुभाष बगाडे, काळुराम मेमाणे, सविता कांचन, सारिका लोणारी, पूजा सणस, अप्पा वाघमोडे, रोहिदास मुरकुटे, निखिल कांचन, भाजपाचे अमित कांचन, खुशाल कुंजीर, उद्योजक अभि कांचन, डॉ. संतोष कांचन, पांडुरंग कांचन, आदि परिसरातील आजी माजी पदाधिकारी, शाळेतील शिक्षक, व परिसरातील तरुणांनी मोठी गर्दी केली होती.







