Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी, दोघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 24 June 2026, 10:50

लोणी काळभोर, ता. २४ : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पायी रस्ता ओलांडताना ट्रक चालकाच्या पायावरून गाडी गेल्याची घटना घडली आहे. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोलपंपासमोर १९ जून रोजी रात्री सुमारे सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धनाजी विठ्ठल थोरबोले (वय ४५) असे जखमी झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा रोहन धनाजी थोरबोले (वय २२, रा. अंबरनाथ प्लॉटिंग, माळीमळा, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वार आणि पांढऱ्या रंगाच्या किया कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी थोरबोले हे गेल्या चार वर्षांपासून कुंजीरवाडी येथील हटकेश्वर कंपनीत ट्रक चालक म्हणून कार्यरत आहेत. १८ जून रोजी ते कामासाठी गेले होते.१९ जून रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी रोहन यांना त्यांचे मित्र सुमित साळवे यांनी फोन करून वडिलांचा अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर ते तातडीने विश्वराज रुग्णालयात पोहोचले. तेथे पोलिसांनी आणि नातेवाईकांनी दाखविलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला.

 

कामावरून घरी परतत असताना राजेंद्र पेट्रोलपंपासमोर धनाजी थोरबोले हे पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी मोबाईलवर बोलत असलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या एमएच-१३ डी-क्यू-८४६६ क्रमांकाच्या वाहनचालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावले. मात्र, त्याच्या पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या किया कारने समोरील वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे पुढील वाहन धनाजी थोरबोले यांच्या अंगावर गेल्याने त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.

प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारांमुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ११९, १३४, १७७, १८४ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १२५ (ब) व २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड नगरपरिषदेत गोंधळ; महिला अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ‘गब्बर वाल्मीकी’वर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 11:25

शिरसवडीत डिझेलचा बेकायदा साठा उघड; 6 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, पेट्रोलपंप व्यवस्थापकासह वाहन मालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 11:20

‘तो’ खून नव्हे अपघातच; केतन अग्रवाल हत्याकांडाला वेगळं वळण; चेतनच्या वकिलांचा खळबळजनक दावा

Wednesday, 24 June 2026, 11:17

चेतनच नव्हे तर सियाचे अनेक तरुणांशी होते संबंध; साखरपुडा केतनशी पण ‘हनिमून’ दुसऱ्यासोबतच…

Wednesday, 24 June 2026, 11:00

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

Wednesday, 24 June 2026, 10:55

लोणी काळभोर येथील अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी, दोघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 10:50
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.