Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Theur News :“उपचाराचे 220 रुपये मागितल्यावर डॉक्टरवर हल्ला; दारूच्या नशेत मद्यपीचा क्लिनिकमध्ये धांगडधिंगा”

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 March 2026, 19:05
Theur News: “Doctor attacked after asking for Rs 220 for treatment; Drunk alcoholic creates ruckus in clinic”

लोणी काळभोर, ता. 19 : दारूच्या नशेत आलेल्या व्यक्तीने (Theur News) उपचाराचे पैसे देण्यास नकार देत डॉक्टरशी वाद घालून क्लिनिकमध्ये तोडफोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर फाटा येथील ‘श्रेया क्लिनिक’मध्ये बुधवारी (ता. 18) दुपारी सुमारे पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत डॉक्टर व एक रुग्ण जखमी झाले असून क्लिनिकच्या काचेच्या दरवाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

संतोष रमेश गुंजाळ (काकडे वस्ती, थेऊर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत डॉ. संतोष महादेव गायकवाड (वय 37) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे थेऊरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संतोष गायकवाड हे तुपे कॉम्प्लेक्स, थेऊर फाटा येथे ‘श्रेया क्लिनिक’ चालवतात. बुधवारी डॉ. गायकवाड हे रुग्णांची तपासणी करत असताना संतोष गुंजाळ हा इसम अचानक तपासणी कक्षात आला. त्याच्या डोक्याला जखम झाल्याने डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पट्टी बांधली व औषधे लिहून दिली. उपचाराचे 220 रुपये बिल मागितल्यावर संबंधित इसमाने पैसे देण्यास नकार दिला. आणि थेट डॉ. संतोष गायकवाड यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

संतोष गुंजाळ याने संतापाच्या भरात क्लिनिकमधील टेबलवरील काच ढकलली तसेच डॉ. संतोष गायकवाड यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर संतोष गुंजाळ क्लिनिकबाहेर जाऊन रस्त्यावर पडलेले दगड उचलून क्लिनिकच्या काचेच्या दरवाज्यांवर आणि पार्टीशनवर फेकून मारत तोडफोड केली. या घटनेत क्लिनिकच्या प्रवेशद्वारासह दोन काचेचे दरवाजे फुटले.

डॉ. गायकवाड व त्यावेळी उपस्थित असलेले रुग्ण हनुमंत बळे (रा. उरुळी कांचन) हे बाहेर येत असताना आरोपीने पुन्हा दगडफेक केली. या दगडांमुळे डॉ. गायकवाड यांच्या पाठीवर व डाव्या हातावर दुखापत झाली, तर उडालेल्या काचेच्या तुकड्यांमुळे रुग्णाच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. दारूच्या नशेत असलेला आरोपी संतोष गुंजाळ हा मोठा दगड उचलताना तोल जाऊन स्वतःच्या डोक्यालाच मार लागल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर डॉ. गायकवाड यांनी 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी संतोष गुंजाळ याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 118(1), 125, 324(4), 352 तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्थांवरील हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम 2010 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
Ashok Kharat Case: The exploits of 'Captain's' partner! A woman standing in a queue for darshan in Shirdi was shown her own obscene photos; The ground beneath the woman's feet...

Ashok Kharat Case: 'कॅप्टन'च्या पार्टनरचा कारनामा! शिर्डीत दर्शनाच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलेला तिचेच अश्लील फोटो दाखवले; महिलेच्या पायाखालची जमीन...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.