राहुलकुमार अवचट

यवत: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग प्रशासनाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून जवळपास 80 दिवे लावण्यात आले असून गेल्या चार दिवसांपासून हे दिवे बंद असल्याने यवत येथे महामार्गावर सर्वत्र अंधार पसरला आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने डिसेंबर महिन्यात यवत गावच्या हद्दीत सुमारे एक किमी अंतरावर दोन्ही बाजूला सुमारे ८० लाईटचे खांब उभे केले असून यावर सुमारे १६० हायमास्ट दिवे बसवण्यात आले होते यानंतर सुमारे चार महिन्यानंतर हे दिवे प्रत्यक्षात सुरू झाले परंतु यानंतर कधी एक दिवस तर कधी दोन दिवस हे दिवे बंद असत परंतु आता मात्र गेल्या चार दिवसांपासून हे दिवे बंद आहेत, महामार्गावरील सर्वच हायमास्ट दिवे बंद असल्याने यवत गावच्या हद्दीत महामार्गावर सर्वत्र अंधारमय दृश्य निर्माण झालेले आहे.

श्रेय घेणारे गेले कुठे नागरिकांमध्ये चर्चा
राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी यवत परिसरात आहे महाराष्ट्र दिवे चालू करण्यात आले यावेळी अनेकांनी हे दिवे चालू करण्याचे श्रेय घेतले होते परंतु गेल्या चार दिवसांपासून हे हायमास्ट दिवे बंद असल्याने गावातील नागरिकांमध्ये दिवे चालू करण्यासाठी श्रेय घेणारे आता गेले कुठे अशी चर्चा रंगू लागली असून महामार्ग प्रशासनाने लवकरात लवकर हे दिवे चालू करावेत अशी मागणी यवत येथील नागरिक करीत आहेत.






