Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोरतापवाडी येथे उद्या शेतकरी वर्गासाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 2 January 2026, 17:25
Special health camp organized for farmers tomorrow at Sortapwadi

उरुळी कांचन, : शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे कारण तो अन्नपुरवठा, कच्चा माल आणि रोजगार यांचा मुख्य स्रोत आहे, जो देशाच्या अन्नसुरक्षेचा पाया रचतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतो, ज्यामुळे शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचे कल्याण देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी एक पाऊल, बळीराजाच्या आरोग्यासाठी या उपक्रमांतर्गत तपासण्या व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी सांगितले आहे.

 

सोरतापवाडी (ता. हवेली) येथे एक पाऊल, बळीराजाच्या आरोग्यासाठी या शिबिराचे आयोजन शनिवारी (ता. 3) करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन शेतकरी वर्गाच्या हितासाठी कायम प्रयत्नशील असलेल्या पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबिरात रुबी हॉल क्लिनिक,जहांगीर हॉस्पिटल ,सह्याद्री हॉस्पिटल,संचेती हॉस्पिटल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल,पूना हॉस्पिटल, औंध जिल्हा रुग्णालय,ससून हॉस्पिटल,आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे,एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल,भारती हॉस्पिटल,डॉ. डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज,सौ. काशीबाई नवले हॉस्पिटल आणि इतर 25 नामांकित हॉस्पिटल्स सहभागी होणार आहेत. या शिबिरात तपासणी ते शस्त्रक्रिया सर्व काही विनामूल्य केले जाणार आहे.

यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया,किडनी ट्रान्सप्लांट,खुबा प्रत्यारोपण,गुडगा प्रत्यारोपण,कँसर शस्त्रक्रिया,लहान मुलांच्या हृदयातील छिद्र,मेंदूची शस्त्रक्रिया,हृदयाची शस्त्रक्रिया,लिव्हर ट्रान्सप्लांट,मणक्याची शस्त्रक्रिया,अस्थिरोग तपासणी व शस्त्रक्रिया,हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया,मूत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया,जनरल तपासणी व शस्त्रक्रिया,सांधे व खुबा प्रत्यारोपण तपासणी व शस्त्रक्रिया,मेंदू व मणके विकार तपासणी व शस्त्रक्रिया,रक्तविकार तपासणी व शस्त्रक्रिया,कान-नाक-घसा तपासणी व शस्त्रक्रिया, बालरोग तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहे.

त्याच्याबरोबर किडनी व लिव्हर प्रत्यारोपण तपासणी व शस्त्रक्रिया,स्त्री रोग तपासणी व शस्त्रक्रिया,नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया,तसेच मोफत चष्मे वाटप,दंतरोग तपासणी व उपचार,मोफत डायलेसिस, मोफत मॅमोग्राफी,मोफत एक्स रे,पोटविकार (गॅस्ट्रो)तपासणी), टू डी इको, एमआयआर , सिटी स्कॅन, सोनोग्राफी,या सर्व महागड्या तपासन्या आणि सहभागी रुग्णांच्या सर्व रक्त चाचण्या मोफत करण्यात येतील. तसेच दिव्यांगांसाठी मोफत आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर्स वाटपासाठी तपासणी शिबीरदेखील होणार आहे. अशी माहिती सुदर्शन चौधरी यांनी दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune Election: BJP's 'victory' even before voting in Pune! Manisha Nagpure elected unopposed

Pune Election : पुण्यात मतदानापूर्वीच भाजपचा 'विजयोत्सव'! मनिषा नागपुरे यांची बिनविरोध निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.