पुणे: पुणे शहरात होणाऱ्या पुणे (Pune Election) महानगरपालिका निवडणुकीसाठी 41 प्रभागांतील एकूण 165 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मोठ्या (Manisha Nagpure) प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, एकूण 3,059 उमेदवारांनी अर्ज भरले होते. यापैकी छाननी प्रक्रियेत 174 उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे छाननीनंतर 2,703 उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, हे उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Latest Marathi News)

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात नेमके किती उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, हे चित्र आज स्पष्ट होणार आहे. अनेक प्रभागांमध्ये राजकीय पक्षांकडून समन्वय साधत काही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम निवडणुकीतील चुरशीवर होणार आहे.
दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीत पहिला बिनविरोध निकाल जाहीर झाला आहे. भाजपच्या उमेदवार मनिषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या प्रभागातील उर्वरित तिन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे मनिषा नागपुरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यामुळे पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाला पहिले यश मिळाले आहे.
मनिषा नागपुरे यांच्या बिनविरोध निवडीनंतर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. तसेच मिठाई वाटप करून हा विजय साजरा करण्यात आला.
आता अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील सर्व 41 प्रभागांमधील अंतिम उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार असून, त्यानंतर निवडणुकीची खरी रंगत वाढण्याची शक्यता आहे.







