Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: जुन्या वादातून रस्ता अडवला अन्… फुरसुंगीत तरुणाचा भररस्त्यात डोक्यात दगड घालून खून

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 January 2026, 14:56
Pune Crime: Road blocked due to old dispute and... A young man was murdered by hitting his head with a stone on the road

पुणे: येवलेवाडी परिसरात दुचाकीवरून आलेल्या (Pune Crime) हल्लेखोरांनी जुन्या वादातून (Pune News) एका पादचारी तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी येवलेवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या 12 तासांत मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

आकाश कृष्णा चाबूकस्वार (वय 21, रा. एकनाथ पुरम हाउसिंग सोसायटी, फुरसुंगी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाशच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी दिली. पोलिसांनी आदित्य सुभाष गायकवाड, गणेश किशोर मोरे आणि कौशल्य उर्फ ऋषी जनार्दन मारे या आरोपींना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 1 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता आकाश येवलेवाडी परिसरातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी त्याचा रस्ता अडवला. जुन्या वादातून त्यांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी आकाशला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.

गंभीर जखमी अवस्थेत आकाशला परिसरातील नागरिकांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवलकर यांच्या आदेशानुसार तातडीने दोन विशेष तपास पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव आणि तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune News

Pune News : इंदापुरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी, तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.