Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: भोसरीत सशस्त्र घरफोडी; नागरिकांच्या धाडसामुळे सराईत गुन्हेगार जेरबंद 

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 24 February 2026, 17:43

पुणे : भोसरी परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास सशस्त्र घरफोडीची धक्कादायक घटना घडली. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 79/2026 नोंदवण्यात आला असून महाराष्ट्र पोलीस कायदा, भारतीय न्याय संहिता आणि आर्म अॅक्टअंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सकाळी फ्लॅट फोडून चोरी

22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.15 ते 7.50 या वेळेत पीसीएमसी चिल्ड्रन पार्कजवळ, चैतन्य पार्क, साईदर्शन बी विंग, इंद्रायणीनगर, भोसरी येथे ही घटना घडली. फिर्यादी धर्मेंद्र अमरेंद्र झा (वय 53) यांच्या फ्लॅटची कडी-लॅच तोडून आरोपींनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाट व लॉकर उचकटून सुमारे 57,500 रुपये रोख रक्कम तसेच चांदीची नाणी चोरीस गेली.

पळून जाताना नागरिकांचा पाठलाग

घरफोडीनंतर आरोपी मोटारसायकलवरून पसार होत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी आरोपी सागरसिंग सुरजसिंग ऊर्फ ‘फंटयास्टिक’ बावरी (अंधरेले), रा. गुरुगोविंद सिंगनगर, जालना आणि त्याच्या फरार साथीदाराने चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवून सुटका करण्याचा प्रयत्न केला.

झटापटीदरम्यान सचिन ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या हाताला चाकूचा वार लागून दुखापत झाली, तर ध्वजशेर शाही यांनाही आरोपीला पकडताना किरकोळ जखम झाली.

दुपारी अटक, साथीदार फरार

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सागरसिंग अंधरेले याला दुपारी 4.50 वाजता अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा साथीदार अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. फरार आरोपीकडे मॅगझीन नसलेली पिस्तुल आणि चाकू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 15 हून अधिक गुन्ह्यांची नोंद

अटक आरोपीवर जालना जिल्ह्यात घरफोडी व चोरीचे 15 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असून फॉरेन्सिक पथकाचीही मदत घेण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे करत आहेत. दरम्यान, संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

Crime News: स्त्यावरून चालणंही झालं अवघड! मागून आला अन् थेट 'कात्रीच' डोक्यात घुसवली; नशेखोराचा अंगावर काटा आणणारा थरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.