Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुन्हेगारी थांबवण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी द्या! मांजरी-केशवनगरमधील 5 एकर जमीन अतिक्रमणमुक्त करून लोककल्याणकारी प्रकल्प राबवण्याची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 March 2026, 22:16

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधील मांजरी केशवनगर आणि साडेसतरानळी परिसरात नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत मोठी मागणी पुढे आली आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आणि नागरीकरणामुळे या भागात आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि मालकी हक्काशी संबंधित प्रश्न तीव्र झाले असून, स्थानिकांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.

 

साडेसतरानळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळील सुमारे 5 एकर एरिकेशन विभागाची जागा सध्या मोकळी असून, ती अतिक्रमणाच्या धोक्यात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ही जागा वेळेत ताब्यात घेऊन त्यावर जनकल्याणकारी प्रकल्प उभारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावित प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक सरकारी रुग्णालय, ई-लर्निंग इंग्लिश माध्यम शाळा, क्रीडा संकुल, प्रशासनिक भवन, विठ्ठल-रुक्माई मंदिर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र यांचा समावेश आहे. या सुविधा उभारल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, परिसरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा हा देखील मोठा मुद्दा बनला आहे. कोयता गँगसारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याची मागणी जोर धरत आहे.

या भागातील जमीन मालकीचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. सर्वे नंबर 206 गोसावी येथील रहिवासी गेल्या 200 ते 300 वर्षांपासून येथे वास्तव्यास असून, त्यांनी नियमितपणे करही भरले आहेत. तरीही त्यांच्या घरांची अधिकृत नोंद सातबारा उताऱ्यावर नाही. त्यामुळे गायरान जमीन गावठाण म्हणून घोषित करून प्रत्येक घरधारकाला मालमत्ता हक्क देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दांगट वस्तीतील रहिवाशांचेही नाव प्रॉपर्टी कार्डावर नोंदवण्याची मागणी आहे.

क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या सर्व मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन दिले आहे. आता प्रशासन या प्रश्नांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते आणि प्रत्यक्षात किती लवकर निर्णय घेतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune Weather: पुणेकरांनो सावधान! पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे; सूर्याचा प्रकोप वाढला, तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

Sunday, 5 April 2026, 7:50

Daily Horoscope: रवी देवांची मोठी कृपा! 5 एप्रिलला ‘या’ राशींचे नशीब पालटणार; तुमच्या खिशात येणार का पैसा? वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 5 April 2026, 7:38

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09
Next Post

Crime News: सावळेश्वर टोल नाक्यावर भयंकर प्रकार! कर्मचाऱ्यांकडून ट्रक चालकाला बेदम मारहाण; संतप्त चालकांनी टोल फोडला, 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.