Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nirmala Navale: कारेगावच्या ‘लेडी सरपंच’ पराभूत होताच ग्रामपंचायतीसमोर नोटांचा सडा; व्हायरल व्हिडिओने पुण्यात राजकीय भूकंप!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 15 February 2026, 17:37
Nirmala Navale: As soon as Karegaon's 'Lady Sarpanch' was defeated, notes were scattered in front of the Gram Panchayat; Viral video causes political earthquake in Pune!

पुणे: पुणे जिल्ह्यातील कारेगावमध्ये (Nirmala Navale) पंचायत समिती निवडणुकीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांच्या पराभवानंतर भाजपच्या विजयी उमेदवाराकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नोटांची उधळण केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Karegaon News)

 

पंचायत समिती कारेगाव गणातून भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा पराभव केला. अधिकृत आकडेवारीनुसार पाचंगे यांना 6693 मते मिळाली, तर नवले यांना 6500 मते मिळाली. म्हणजेच 193 मतांचा फरक राहिला. (याआधी 329 किंवा 393 मतांचा उल्लेख केला जात असला तरी अंतिम निकालानुसार फरक 193 मतांचा असल्याची माहिती स्थानिक स्तरावर सांगितली जात आहे.)

पराभवानंतर निर्मला नवले यांनी निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर पैसा, दारू आणि ड्रग्जचा वापर झाल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यामुळे आधीच राजकीय वातावरण तापले होते. आता व्हायरल व्हिडिओमुळे वादाला अधिकच खतपाणी मिळाले आहे.

व्हिडिओमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोठी गर्दी दिसते. कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल उधळलेला आहे. जल्लोष सुरू असताना कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ चलनी नोटा उधळल्या जात असल्याचे दृश्य दिसते. घोषणाबाजी सुरू असताना काही जण नोटा हवेत फेकताना दिसत आहेत.

हा जल्लोष विजयी उमेदवार मनीषा पाचंगे यांच्या समर्थकांचा असल्याचा दावा करण्यात येतो आहे. तसेच उमेदवाराकडूनच पैसे उधळण्यात आल्याचा आरोपही काहींकडून केला जात आहे. मात्र, या आरोपांबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता असूनही पराभव पत्करावा लागल्याने निर्मला नवले यांच्याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. दुसरीकडे, भाजप समर्थकांनी विजयाचा उत्सव साजरा करताना कोणतीही बेकायदेशीर कृती केल्याचा आरोप फेटाळला असल्याची माहिती मिळते आहे.

या व्हिडिओची सत्यता, नोटा उधळण्यामागील नेमका उद्देश आणि कायदेशीर बाबींची पडताळणी प्रशासनाकडून होणे आवश्यक आहे. कारेगावमधील या घडामोडींमुळे शिरूर तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणी अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
Pune Shocking News: Professor's exploits in Pune! 'I won't do anything wrong', 'Tsale' message to female students; Don't touch it, threatening marks...

Pune Shocking News: पुण्यात प्राध्यापकाचा कारनामा! 'माझं काही वाकडं होणार नाही' म्हणत विद्यार्थिनींना 'तसले' मेसेज; मार्कांची धमकी देत नको तिथे हात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.