Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

NCP Youth Congress : यवतमध्ये दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक; दूध ओतून आंदोलन

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Wednesday, 6 December 2023, 19:28

राहुलकुमार अवचट

यवत  : शासनाने दुधासाठी निश्चित केलेला हमी दर न देणाऱ्या सरकारी व खाजगी दूध प्रकल्पांवर कारवाई करावी, दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा. या व इतर मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर दूध ओतून देत आंदोलन केले.

या आंदोलनात तरूण व सुशिक्षित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

 

मागील काही कालावधीपासून दुधाचा दर सातत्याने घसरत चालला आहे. सध्या तो ३५ रुपयांवरुन अचानक कमी होवून २६ ते २९ रुपयांवर आला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना मोठ्या अर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेतपीक येईल की नाही याची खात्री नाही. या आंदोलनाची दखल न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्तांच्या वतीने देण्यात आला.

सरकारने दूध दरवाढ लवकरात लवकर करावी. दूध दरवाढ ४० रुपये प्रति लिटर हमीभाव जाहीर करावा, जून ते आजपर्यंत दुधाला मिळालेला कमी दरातील फरक दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा. पशुखाद्याच्या किंमती २५ टक्क्यांनी कमी कराव्यात. सध्या महागाई खुप वाढत आहे. परंतु वाढत्या महागाईच्या प्रमाण दुधाचे भाव एक रूपयाने सुद्धा वाढत नसुन ते कमी-कमी होत आहे.

तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा खर्च हा देखील वाढत आहे. या महागाईला आळा घालण्यासाठी दुधाला वाढता बाजारभाव मिळण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सर्व दुध व्यवसायीक यांच्यावतीने दौंड तहसील कार्यालयाचे अधिकारी तथा यवतचे मंडल अधिकारी प्रकाश गोंडे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नियोजन दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत दोरगे व सहकारी यांनी केले.

यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रामभाऊ टुले, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस अजित शितोळे, दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन काळभोर, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष भाऊसाहेब फडके, सरिका भुजबळ, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आनंद शेलार, किसान सेलचे अध्यक्ष राहुल वर्पे, रोहन दोरगे यांच्यासह यवत आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

काल्याच्या कीर्तनाने श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्याची सांगता; दहीहंडी फोडून भाविकांना महाप्रसाद वाटप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.