लोणी काळभोर, ता.26: लोणी काळभोर (Loni Kalbhor News) (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनील बाबुराव गायकवाड (Deputy Sarpanch Sunil Gaikwad) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे लोणी काळभोर सह परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. (Deputy Sarpanch Loni Kalbhor)

माजी उपसरपंच सविता नितीन जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया लोणी काळभोर ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (ता.26) पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया सरपंच नागेश काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी सुनील गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नागेश काळभोर यांनी उपसरपंच पदी सुनील गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व पॅनल प्रमुख प्रशांत काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, राहुल काळभोर, आबासाहेब काळभोर, माऊली काळभोर, संजय गायकवाड, हेमंत गायकवाड, संतोष भोसले, राहुल अप्पा काळभोर, गणेश कांबळे, राकेश लोंढे, उद्योजक रमजान तांबोळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुणे प्राईम न्यूजशी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच सुनील गायकवाड म्हणाले की, पॅनल प्रमुख प्रशांत काळभोर व महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच मला उपसरपंच पदाची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.







