लोणी काळभोर: “अंगावर पडल्या शेण्या अन् दगड-गोटे, तरीही तिने (Loni Kalbhor News) पाय आपले कधीच नाही रोखले… अज्ञानाच्या अंधारात तिने पेटवली ज्ञानाची ज्योत, तीच ठरली स्त्री शिक्षणाची खरी भाग्यविधाती आणि साक्षात मूरत.” आज आपण ज्या मुली शाळेत जात आहोत, मोठ्या (Pune News) पदांवर काम करत आहोत, हे सर्व सावित्रीबाईंच्या संघर्षाचे फळ आहे. “सावित्री तू नसतीस तर, अज्ञानाचा अंधार असता, तुझ्यामुळेच आज स्त्रियांचा सन्मान आणि आधार उरला.” असे प्रतिपादन डॉ. स्नेहा बुरगुल यांनी केले आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती शनिवारी (ता.3) साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन डॉ. स्नेहा बुरगुल यांनी केले.
पुढे बोलताना डॉ. स्नेहा बुरगुल म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिरावांसोबत झाला. लग्नानंतर ज्योतिरावांनी त्यांना अक्षर ओळख करून दिली आणि सावित्रीबाई देशातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. केवळ शिक्षणच नाही, तर बालविवाह रोखणे, विधवा विवाहास प्रोत्साहन देणे आणि अनाथ मुलांसाठी आश्रम उघडणे अशी अनेक समाजसुधारणेची कामे त्यांनी केली. 1897 मध्ये पुण्यात जेव्हा प्लेगची साथ आली, तेव्हा रुग्णांची सेवा करतानाच त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर म्हणाले की, ” ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणे हे पाप मानले जात होते, त्या काळात अंगावर शेण-दगड सोसून त्यांनी ज्ञानाची गंगा घराघरात पोहोचवली. त्यावेळी मुलींना शिकवणे ही मोठी हिंमत होती. जेव्हा सावित्रीबाई शाळेत शिकवायला जायच्या, तेव्हा लोक त्यांच्यावर शेण फेकायचे, दगड मारायचे. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी शांतपणे तो अपमान सोसला आणि आपल्या झोळीत दुसरी साडी नेऊन आपले कार्य सुरूच ठेवले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माहित होते की, “एक मुलगा शिकला तर एक व्यक्ती शिकते, पण एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते.” सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे चार्जर सरपंच या पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती प्रधान मंत्री पदापर्यंत स्त्रिया विविध क्षेत्रात मग ते राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीपथावर आहेत. याचे खरे श्रेय सावित्रीबाई फुलेंना जाते. असे यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य मंजुळकर म्हणाले. दरम्यान, कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले.







