Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

I-sarita Portal : मालमत्ता खरेदी करणाऱ्यांची चांदी! ‘ई-सरिता’ पोर्टलवर नवं फिचर लाँच; आता घर बसल्या होणार तुमचं काम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 December 2025, 16:02

I-sarita Portal: पुणे: महापालिका क्षेत्रात जुनी सदनिका खरेदी करताना त्यावर महापालिकेचा मालमत्ता कर  (Municipal corporation property tax) किंवा इतर करांची थकबाकी असल्यास ती माहिती आता दस्त नोंदणीच्या वेळीच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घर खरेदी करताना होणारी संभाव्य फसवणूक टळण्यास मदत होणार आहे. तसेच महापालिकांनाही थकबाकीची रक्कम सहजपणे मिळणार आहे.

हेही वाचा- रणवीर सिंह अन् अक्षय खन्ना स्टारर ‘धुरंधर’ 500 कोटींच्या क्लबमध्ये; ‘या’ चित्रपटाचा विक्रम मोडीत

 

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह एकूण 28 महापालिकांमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. सध्या शहरांमध्ये नव्या सदनिकांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने अनेक नागरिक जुन्या सदनिका खरेदी करण्याकडे वळत आहेत. मात्र अशा सदनिकांवर महापालिकेचा मालमत्ता कर किंवा अन्य करांची थकबाकी असल्याचे अनेकदा समोर येते.

अनेक वेळा विक्रेते ही थकबाकी जाणीवपूर्वक लपवतात. त्यामुळे खरेदीदार दस्त नोंदणी केल्यानंतर मालमत्ता कराची नोंद नावावर करण्यासाठी महापालिकेत जातो, तेव्हा त्याला आधी थकबाकी भरण्याची सूचना दिली जाते. यामुळे खरेदीदाराला अचानक मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो आणि मानसिक त्रासही होतो. ही अडचण टाळण्यासाठी महापालिकेची कर थकबाकी ऑनलाइन दिसावी, अशी मागणी होती.

नोंदणी पोर्टलवर सुविधा उपलब्ध

या पार्श्वभूमीवर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आय सरिता या दस्त नोंदणी पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला 2016 साली पुणे महापालिकेच्या हद्दीत हा प्रयोग करण्यात आला होता. आता तो राज्यातील अन्य शहरांमध्येही लागू करण्यात आला आहे.

या सुविधेमुळे दस्त नोंदणी करताना संबंधित सदनिकेचा मालमत्ता कर क्रमांक टाकल्यास त्यावरील महापालिकेचा कर आणि थकबाकीची माहिती तात्काळ दिसणार आहे. थकबाकी असल्यास ती याच पोर्टलवर भरता येणार आहे. थकबाकी भरल्यानंतर महापालिकेच्या संकेतस्थळावर त्याची नोंद झाल्याचा संदेशही मिळणार आहे.

महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क कायद्यानुसार दस्त नोंदणी करताना थकबाकी भरणे बंधनकारक नाही. त्यामुळे खरेदीदाराला थकबाकी भरायची किंवा नाही याचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र मालमत्ता कर नावावर करण्यासाठी थकबाकी भरणे आवश्यक राहणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post
Pune Metro

Pune Metro : पुणे मेट्रोचं जाळं आता वाघोली ते चांदणी चौकपर्यंत! नव्या दोन मार्गांना केंद्राचे ग्रीन सिग्नल; निगडी आणि खराडीकरांसाठी मोठी अपडेट!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.