पुणे: सणासुदीचा काळ आणि लग्नसराई लक्षात घेता सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 17 सप्टेंबर रोजी देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घट झाली. माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 513 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा भाव सुमारे 1.52 लाख रुपयांवर आला. चांदीच्या दरातही किलोमागे 1695 रुपयांची घट झाली असून भाव सुमारे 2.30 लाख रुपये झाला.

10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 1.56 लाख रुपये होता. त्याच वेळी चांदीचा दर 1 किलोसाठी सुमारे 2.37 लाख रुपये होता. त्यानंतर सोन्याच्या दरात जवळपास 4 हजार रुपयांची, तर चांदीच्या भावात सुमारे 8 हजार रुपयांची घट झाली आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि भू-राजकीय घडामोडींमुळे पुढील काळात सोन्याच्या दरात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 18 सप्टेंबर रोजी सकाळच्या दरानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,51,849 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1,51,241 रुपये, 20 कॅरेटचा 1,39,094 रुपये, 18 कॅरेटचा 1,13,887 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 88,832 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यासह मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सांगली आणि बारामती येथे 24 कॅरेट सोन्याचा सकाळचा दर 1,51,849 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आला आहे. चांदीचा भाव 18 सप्टेंबर रोजी सकाळी 2,29,642 रुपये प्रति किलो इतका होता. स्थानिक कर, मेकिंग चार्ज आणि इतर शुल्कांमुळे ग्राहकांना प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी वेगळा दर लागू होऊ शकतो.







