Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: खून का बदला खून? कुरकुंभजवळ दुहेरी हत्याकांडातील आरोपीची निर्घृण हत्या; पाटस परिसरात तणाव

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 21 February 2026, 11:19

दौंड, ता. 21: दौंड तालुक्यातील पाटस परिसरात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची सावली पुन्हा गडद झाली आहे. 2021 मधील रक्तरंजित घटनेतील एका आरोपीची शुक्रवारी रात्री पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभजवळ निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे पाटस व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय-29, रा. पाटस, ता. दौंड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी महेश मारुती टुले यांनी दौंड पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद माकर, विकी शितकल, संतोष शितकल (रा. आंबिकानगर, पाटस) तसेच अन्य दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध खून व जीवघेण्या हल्ल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 20) रात्री सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास भागवत आपल्या साथीदारांसह दुचाकीवरून पाटसकडे परतत होता. मुकदमवाडी उड्डाणपुलावर पोहोचताच पाठीमागून आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत ते खाली कोसळताच हल्लेखोरांनी कोयता व सत्तूरसारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या भागवतचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.

दरम्यान, 4 जुलै 2021 रोजी पाटस येथील तामखडा परिसरात शिवम शितकल आणि गणेश माकर या दोन तरुणांची निर्घृण हत्या झाली होती. त्या दुहेरी हत्याकांडात महेश उर्फ मन्या भागवत याच्यासह काही जणांवर यवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. संबंधित आरोपी सध्या जामिनावर बाहेर होते.

कुरकुंभजवळ झालेल्या या हल्ल्यात जुन्या प्रकरणातील तिघांना लक्ष्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी भागवतचा मृत्यू झाला असून उर्वरित दोघे जखमी असल्याचे समजते. त्यामुळे 2021 च्या दुहेरी हत्याकांडाचा सूड उगवला गेला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेनंतर पाटस व परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat :

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Mulshi Accident : नियंत्रणाबाहेर गेलेला डंपर थेट घरात घुसला; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर, मुळशीतील थरकाप उडवणारी घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.