दौंड: दौंड तालुक्यातील लिंगाळी येथील एका वसाहतीतील पार्किंग (Daund News) केलेल्या तब्बल 16 गाड्या अज्ञाताने जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. आगीची घटना रविवारी (ता. 28) पाऊणे बारा सोमवारी (ता. 29) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास लिगांळी रोड हद्दीतील कल्पतरू (Pune News) अपार्टमेन्टमध्ये घाडली आहे. या घटनेत 17 दुचाकी वाहने, 1 चारचाकी कार व 2 सायकली यांचा समावेश आहे. याप्रकरणी अपार्टमेंट मधील रहिवासी हनीफ हमीद तांबोळी यांनी दौंड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, हनीफ तांबोळी हे रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास दौंड येथील दुकान बंद करूनहते घरी कल्पतरू अपार्टमेन्ट येथे आले होते. त्यानंतर थोड्या वेळाने 1 वाजण्याच्या सुमारास अपार्टमेन्टच्या पार्किंगमधून कसलातरी मोठ्याने आवाज येवू लागल्याने तांबोळी हे अपार्टमेन्ट मधल्या लोकांसह पार्किंगमध्ये आले.
यावेळी त्यांना पार्किंगमध्ये पार्क करून लावलेल्या अपार्टमेन्टमधल्या सर्व मोटरसायकलला कशानेतरी आग लागून त्या जागीच जळून खाक होवून नुकसान झाल्याचे दिसून आले. तसेच पार्किंगमधली अपार्टमेन्टचे सर्व इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक होवून नुकसान झालेले होते. आगीमुळे पार्किंगचे पूर्ण प्लास्टर गळून खाली पडले तर शेजारील पत्र्याची देखील शेड खाली पडली.
या आगीत 17 दुचाकी वाहने व 2 सायकली पूर्णपणे जळाल्याने त्यांचा फक्त सांगाडा उरला आहे. अपार्टमेंट मध्ये राहणारे बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्यांनी कर्जावर ही वाहने खरेदी केलेली आहेत. त्यापैकी बहुतांश वाहनांचा विमा कालावधी संपला होता. संरक्षक भिंत व प्रवेशद्वार असणार्या अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा नाही.
दरम्यान, अपार्टमेंट मधील आगीत राकेश पाटील यांची चार चाकी कार, अनुप दिनेश थोरात, दिलीप कुमार चौधरी, विशाल संसारे, श्रीदेवी अरविंद जोशी व साफिया हमीद तांबोळी यांच्या प्रत्येकी दोन दुचाकी वाहने जळाली आहेत. तर मेघा विनोद बनसोडे, विनोद दौलतराव बनसोडे, रमेश नाना मेरगळ, सिध्दराम ओगे, असगर शेख, अश्विनी महामुनी, नीलेश शिर्के यांचे प्रत्येकी एक दुचाकी वाहन जळाले आहे. अज्ञाताकडून अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये लावण्यात आलेल्या या दुचाकी वाहने इंधन टाकून जाळण्यात आल्याची प्राथमिक माहिती काही नागरिकांनी दिली आहे. पोलिस उप निरीक्षक अविनाश गायकवाड पुढील तपास करीत आहेत.







