भिगवण: दौंड तालुक्यातील भिगवण परिसरात 17 तारखेला दुपारी 4 च्या सुमारास (Bhigwan Kidnapping Case) घडलेली एक घटना सध्या अनेक प्रश्न निर्माण करत आहे. लग्नासाठी (Bhigwan News) सोन्याची खरेदी करून आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी परतत असताना 21 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने (Daund News) टेम्पोमध्ये कोंबून नेण्यात आल्याची तक्रार तिच्या आईने केली. या प्रकरणी जहीर हरून शेख आणि (Pune Crime) आयान हरून शेख, दोघे सख्खे भाऊ, रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे, यांच्याविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Latest Marathi News)

आईच्या फिर्यादीनुसार, आरोपींनी दांडक्याने मारहाण करत तिच्या आणि मुलाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकली व तरुणीला उचलून टाटा एसी वाहनात टाकून नेले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. मात्र तपासादरम्यान कथानकाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांसमोर तरुणीने आपण स्वतःच्या इच्छेने गेल्याचे सांगितले आहे. यामुळे अपहरणाचा दावा आणि तरुणीचे विधान यांत स्पष्ट विसंगती दिसत आहे.
तरुणीच्या आईचा आरोप आहे की, पतीच्या कोरोना काळातील निधनानंतर काही व्यक्तींनी घरात पुरुष नसल्याचा फायदा घेत मुलीवर दीर्घकाळ मानसिक दबाव टाकला. गेली 12 वर्षे तिला ब्लॅकमेल केले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मुलगी दबावाखालीच पोलिसांसमोर बोलत आहे, असा त्यांचा दावा आहे. मुलगी आमच्यासोबत आली नाही तर आम्ही आत्महत्या करू, असा इशाराही त्यांनी माध्यमांसमोर दिला.
या प्रकरणाचे महत्त्व एवढेच नाही की हा अपहरणाचा गुन्हा आहे की परस्पर संमतीने गेलेली तरुणी; तर हा वाद कौटुंबिक तणाव, प्रेमसंबंध, सामाजिक दबाव आणि कायदेशीर अधिकार यांच्या सीमारेषेवर उभा आहे. 21 वर्षांची व्यक्ती कायदेशीरदृष्ट्या सज्ञान असली तरी तिच्यावर दबाव आहे का, याचा तपास करणे अत्यावश्यक आहे. न्यायालयात तिचे स्वतंत्र निवेदन आणि पोलिसांची सखोल चौकशी यावर पुढील दिशा ठरणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून सत्य काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







