Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Politics: अजितदादांनंतर बारामतीचा गड कोण लढवणार? अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; निवडणूक आयोगाची सर्वात मोठी अपडेट!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 11 March 2026, 19:32
Baramati Politics: Who will contest the Baramati seat after Ajitdada? Final voter list released; Election Commission's biggest update!

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर (Baramati Politics) रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीच्या (Ajit Pawar Death) हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रक्रियेचा भाग म्हणून प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून बारामती मतदारसंघातील एकूण (Sunetra Pawar) मतदारसंख्या 383767 इतकी नोंदवण्यात आली आहे.

 

निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार 9 फेब्रुवारी 2026 रोजी या मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नागरिकांकडून दावे आणि हरकती स्वीकारण्यात आल्या. प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक त्या दुरुस्त्या केल्यानंतर 10 मार्च 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

या अंतिम यादीत पुरुष मतदारांची संख्या 193496, महिला मतदारांची संख्या 190271 तर इतर मतदारांची संख्या 24 इतकी आहे. एकूण 383767 मतदार या मतदारसंघात नोंदवले गेले असून आगामी पोटनिवडणुकीसाठी ही यादी आधार मानली जाणार आहे. बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक कधी जाहीर होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीबाबतही हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील राजकीय वारसा कोण सांभाळणार याबाबत चर्चा सुरू होती. त्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटी बैठकीत या विषयावर चर्चा झाली असून पोटनिवडणूक लढवण्याबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

तसेच ही निवडणूक शक्य असल्यास बिनविरोध करण्यावरही पक्षाचा भर असू शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बारामती हा पवार कुटुंबाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असल्याने या पोटनिवडणुकीकडे राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर पुढील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post

Pune Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात; दोन्ही चालक गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.