बारामती: ज्या वयात स्वप्न पाहायची, करिअर घडवायचे, त्याच २३ व्या वर्षी विक्रम उर्फ बबलू कोळपे या तरुणाने मृत्यूला (Baramati News) कवटाळले. बारामती तालुक्यातील रुई बयाजीनगर येथील ही घटना असल्याचे समोर आले आहे. प्रेम प्रकरणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. 15 फेब्रुवारीच्या सायंकाळी विक्रमने घरातच गळफास घेतला. त्याने चिठ्ठी लिहिले कि, “आई मला माफ कर… मला ब्लॅकमेल करून खूप मानसिक त्रास दिला जात आहे,” दरम्यान, या प्रकरणी तरुणी आणि तिच्या पालकांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
विक्रम आणि संबंधित तरुणीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाचे आश्वासन देऊन दोघ 5 वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. तरुणीच्या घरच्यांचा विरोध सुरू झाला आणि इथूनच छळाचा सिलसिला सुरू झाला. आरोप असा आहे की, केवळ लग्नाला नकारच दिला गेला नाही, तर विक्रमचा मानसिक छळ केला गेला.
27 डिसेंबर 2025 पासून त्याला वारंवार फोन करून धमकावणे, त्याचे खासगी फोटो आणि चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यास भाग पाडणे, असे प्रकार घडले. दरम्यान, छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणीघरच्या तरुणी आणि तिच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.







