पुणे : राज्यभरात आगामी (Baramati News) महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत. विविध पक्षांमध्ये बेरीज-वजाबाकीची समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न (Ajit Pawar) सुरू असताना, पुण्यात पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही (Sharad Pawar) दिवसांपासून सुरू होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने या चर्चा सध्या तरी फिस्कटल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. (Latest Marathi News)

अशातच आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या जागतिक एआय सेंटरचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमासाठी उद्योगपती गौतम अदानी हे त्यांच्या पत्नी डॉ. प्रीती अदानी यांच्यासह उपस्थित होते. या निमित्ताने पवार कुटुंबीय अनेक दिवसांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले पाहायला मिळाले, त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
या कार्यक्रमात व्यासपीठावर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे सर्व उपस्थित होते. पवार कुटुंबातील सर्व प्रमुख नेत्यांची एकत्र उपस्थिती लक्षवेधी ठरली.
दरम्यान, कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या फोटोमुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भविष्यात एकत्र येतील का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
बारामतीतील या एआय सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत भाषणाची सुरुवात केली. त्यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांचा उल्लेख विनोदी पद्धतीने केला. त्यांच्या या भाषणामुळे सभागृहात हास्याचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबातील मनमोकळ्या संवादाचे दर्शन घडले, असेही अनेकांनी सांगितले.







