Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: पुणे-पिंपरीत काका-पुतण्याचा ‘मास्टरस्ट्रोक’! मविआला डावलून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अधिकृत घोषणेची वेळ ठरली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 28 December 2025, 22:23
Pune Politics: Uncle-nephew's 'masterstroke' in Pune-Pimpri! Both nationalists unite, leaving Mavila behind? Time for official announcement

पुणे: पुण्याच्या राजकारणात (Pune Politics) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता ठोस वळण मिळताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे दोन्ही पक्ष पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याची शक्यता जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत उद्या दुपारी अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

 

महत्त्वाची बाब म्हणजे आज पुण्यात महाविकास आघाडीकडून जागावाटपाबाबत चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र शरद पवार गटाच्या नेत्यांना दोन वेळा निरोप पाठवूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या चर्चेतून शरद पवारांचा पक्ष बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा अधिक बळावली.

खरंतर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठका झाल्या तेव्हाच युती होण्याचे संकेत मिळाले होते. मात्र सुरुवातीला अजित पवार गटाकडून शरद पवार गटासमोर काही अटी ठेवल्या गेल्या होत्या. अजित पवार गटाकडून केवळ 35 जागांची ऑफर देण्यात आली होती, तसेच सर्व उमेदवारांनी केवळ घड्याळ या एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव शरद पवार गटाला मान्य नव्हता. त्यामुळे काही काळ दोन्ही राष्ट्रवादींची युती फिस्कटल्याची चर्चा होती.

या अटी मान्य न झाल्यानंतर शरद पवार गटाने त्याच दिवशी संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक घेत जागावाटपाबाबत चर्चा सुरू केली होती. मात्र आता धक्कादायकपणे शरद पवार गटाने महाविकास आघाडीच्या या चर्चेतूनही माघार घेतल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या घड्याळ आणि तुतारी या निवडणूक चिन्हांवरच निवडणूक लढवणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबत उद्या दुपारी घोषणा होण्याची शक्यता असून, पुणे महापालिकेचा अंतिम निर्णय आज रात्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्या दोन्ही शहरांतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Pune Crime: कारमध्ये आराम करणं पडलं महागात! लोखंडी रॉडने काच फोडून महिलेचं मंगळसूत्र ओरबाडलं, सोनं लंपास करून चोरटे पसार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.