Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गांजा प्रकरणातील दोन सख्ख्या भावांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 17 June 2026, 17:31

पुणे, ता. १७ : ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन सख्ख्या भावांना बाणेर पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती अॅड. सौरव जायभाये यांनी दिली आहे.

अभिषेक भिका बोरसे आणि अक्षय भिका बोरसे अशी जमीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पीएमसी जलतरण तलावाच्या मागील रस्त्यावर, ज्युपिटर हॉस्पिटलजवळ सापळा रचून कारवाई केली होती. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता अभिषेक बोरसे याच्या बॅगेत २.९७० किलो गांजा आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी गांजासह दोन मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरण्यात आलेली हों्डा शाईन मोटारसायकल, विदेशी चलनाच्या नोटा, रोख रक्कम व अन्य कागदपत्रे असा एकूण २ लाख २० हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) आणि २२(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती.

 

हा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात आरोपींनी अॅड. सौरव जायभाये व अॅड. हर्षवर्धन दरेकर यांच्यामार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला असून आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने योग्य त्या अटी व शर्तीच्या अधीन राहून आरोपींनी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व त्याच रकमेच्या हमीदारासह जामीन मंजूर केला.या खटल्यात कुणाल ढवळे व दिग्विजय काळभोर यांची बहुमुल्य मदत मिळाली.

दरम्यान, न्यायालयाने आरोपींना फिर्यादी किंवा साक्षीदारांशी संपर्क न साधण्याचे निर्देश दिले असून, सुटका झाल्यानंतर सात दिवसांच्या आत कायमस्वरूपी पत्ता व दोन जवळच्या नातेवाईकांची माहिती तपास अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नरसापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा! मृत्यूनंतरही अत्याचार केल्याची माहिती; न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनाही रडू कोसळलं…

Wednesday, 17 June 2026, 18:08

गांजा प्रकरणातील दोन सख्ख्या भावांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Wednesday, 17 June 2026, 17:31

Yavat Crime News : पाटातील पाणी बकरीने प्यायल्याने वृद्ध मेंढपाळासह कुटुंबाला लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; दौंड तालुक्यातील घटना..

Wednesday, 17 June 2026, 17:24

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! मिसिंग लिंकजवळ तीन गाड्यांची धडक

Wednesday, 17 June 2026, 17:20

‘यशवंत’ साखर कारखान्याचा मार्ग 15 वर्षांनंतर मोकळा! पुणे बाजार समितीकडून जमीन खरेदी पूर्ण

Wednesday, 17 June 2026, 16:48

“पुणे जिल्हा होणार भिकमुक्त; एकही नागरिक उपाशी झोपणार नाही” – राज्य अन्न प्रशासन आयोगाचा निर्धार

Wednesday, 17 June 2026, 16:42
Next Post

नरसापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा! मृत्यूनंतरही अत्याचार केल्याची माहिती; न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनाही रडू कोसळलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.