यवत, राहुलकुमार अवचट

Pune : आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी आली ही बातमी ऐकल्यानंतर अनेकांना विश्वासच बसत नव्हता. आपले लाडके दादा आपल्यात नाहीत, हे सत्य मान्य करणे हे खूप कठीण असून महाराष्ट्राच्या विकासासाठी बरच काही करणारा व भविष्याचा विचार करणारे एक एक नेते आपल्यातून आज निघून गेले
उपमुख्यमंत्री अजित पवारांची अकाली एक्झिट खरच महाराष्ट्राच्या प्रत्येक जनमनाला चटका लावणारी आहे. या दुर्दैवी अपघाताची माहिती काही क्षणात गावात पसरली
यवत ,केडगाव, वरवंड, पाटस, राहू, पारगाव यांसह दौंड तालुक्यातील अनेक गावात गावातील व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद केली व कडकडीत बंद पाळत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाबाबत शोक व्यक्त केला अनेक गावातील व्यापाऱ्यांनी स्वतःहून पुढे येत बंदचा निर्णय घेतला
अजित पवार आणि दौंड तालुक्याचे असलेले ऋणानुबंध यामुळे दौंड तालुक्यात सर्वत्र गाव बंद ठेवत सार्वजनिक दुखवटा पाळण्यात आला . अजित पवारांच्या जाण्याने पुणे जिल्हा , दौंड तालुका व गाव पोरक झालं अशा भावना गावातील ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या. व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली तर यवत येथील काही नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना अश्रू अनावर झाले.







