अहिल्यानगर: संगमनेर पालिका (Pune Crime) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Sangamner News) शहराच्या प्रवेशद्वाराजवळ एक कोटी रुपयांच्या रोकड सापडली होती. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर आता सत्य समोर आलं आहे. खांडगाव फाटा परिसरात शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या सर्वेक्षण पथकाने एका कारमधून सुमारे 1 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. या घटनेने परिसरात खळबळ माजली आणि राजकीय हालचालींना आणखी वेग आला होत. ही रोकड नेमकी कोणाची आणि कुठे वापरली जाणार याबाबत चर्चा होत होत्या. (Breaking News)

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने विविध ठिकाणी प्रचार, आघाडी किंवा युतीच्या बैठका सुरू आहेत. आचारसंहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात ही रोकड आढळल्याने निवडणूक आयोगानेसुद्धा तपास काटेकोरपणे केला. गेल्या काही महिन्यांत संगमनेरचं राजकीय वातावरण तापलेलं असतानाच इतकी मोठी रक्कम आढळल्याने शहरात ही रोकड निवडणुकीसाठी वापरली जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती.
तपासात दोन्ही कंपन्यांकडून सादर केलेल्या कागदपत्रांमुळे आता नवी माहिती समोर आली आहे. पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी मागितलेले सर्व दस्तऐवज अजमेरा आणि अक्षया कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी उपलब्ध करून दिले. प्राथमिक माहितीनुसार, ही रक्कम धाराशिवमधल्या एका बँकेतून काढण्यात आली होती. पडताळणीनंतर सर्व रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली.
निवडणूक आयोगाकडून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे आणि पुराव्यांनुसार ही रोकड निवडणुकीतल्या गैरव्यवहारासाठी वापरण्याचा हेतू नसल्याचे संकेत मिळाले आहेत. अंतिम पडताळणी झाल्यानंतर ही रक्कम संबंधित कंपनीकडे परत देण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







